Homeआर्थिकSBI Card Stock | एसबीआयचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, 1260 रुपयांपर्यंत...

SBI Card Stock | एसबीआयचा ‘हा’ स्टॉक करू शकतो कमाल, 1260 रुपयांपर्यंत जाऊ शकतो शेअरचा भाव; एक्सपर्टने म्हटले खरेदी करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Card Stock | बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) गव्हर्नरने अनेक घोषणा केल्या. एकीकडे त्यांनी रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90% केला. दुसरीकडे, त्यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) शी क्रेडिट कार्ड लिंक करण्याबद्दल सांगितले. याकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयाचा शेअर बाजारातील SBI कार्डच्या स्टॉकवर कसा परिणाम होईल ? ते जाणून घेवूयात. (SBI Card Stock)

 

यापूर्वी काय होते नियम ?
आतापर्यंत फक्त बचत खाते किंवा चालू खातेच यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी होती. मात्र, आधी Rupay कार्डने सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर इतर कार्डांसाठी परवानगी दिली जाईल. याचा अर्थ असा की जर तुमच्या खात्यात पैसे नसतील तर तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे देऊन पेमेंट करू शकाल. तज्ञांच्या मते, यामुळे ट्रांजक्शन खर्च कमी होईल आणि स्वीकार्यता वाढेल.

 

SBI Card शेअरवर याचा कसा परिणाम होईल ?
RBI कडून माहिती सामायिक केल्यानंतर ब्रोकरेज फर्म SBI कार्ड स्टॉकला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की यामुळे क्रेडिट कार्डचा वापर लक्षणीय वाढेल. तसेच त्याची स्वीकारार्हता वाढेल. (SBI Card Stock)

 

1260 रुपयांपर्यंत जाणार कंपनीचा शेअर !
दुसरी ब्रोकरेज फर्म Yes Securities ने SBI कार्डला Buy रेटिंग दिले आहे. फर्मने या स्टॉकसाठी 1260 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की मागील दोन तिमाहीत कार्ड सोर्सिंग रन रेट कायम ठेवण्याचा कंपनीला विश्वास आहे.

 

Web Title :- SBI Card Stock | sbi card stock may give higher return in one year expert gives buy rating

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News