फायद्याची गोष्ट ! SBI कार्डव्दारे ‘कमाई’ करण्यासाठी व्हा तयार, फेब्रुवारीमध्येच मिळणार आहे ‘संधी’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याचदा लोक पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतात. काही लोक गुंतवणूक करून पैसे कमवितात. यासाठी बँकांमध्ये एफडी किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. दरम्यान, बऱ्याच वेळा कंपन्यांच्या इनीशियल पब्लिक ऑफर किंवा आईपीओ मुळेदेखील गुंतवणूकदारांना फायदा होतो. 2019 मध्ये सोन्या-चांदीपेक्षा आयपीओ गुंतवणूकदारांना श्रीमंत बनविण्यास फायदेशीर ठरले आहे. त्यात आता तुम्ही पुढील काही दिवसांत एसबीआय कार्डच्या आयपीओद्वारेही कमाई करू शकता.
वास्तविक, शेअर बाजाराला रेग्युलेट करणारी बाजार नियामक सेबीने एसबीआय कार्डच्या आयपीओला मान्यता दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस हा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या आयपीओमधून 9,000 – 10,000 कोटी रुपये जमा करू शकते.
आयपीओ म्हणजे काय ?
जेव्हा कंपनी पहिल्यांदा बाहेरील लोक आणि संस्थांना आपले शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवते तेव्हा या प्रक्रियेस आयपीओ असे म्हणतात. जेव्हा आपण हे शेअर्स खरेदी करता तेव्हा आपल्याला कंपनीमध्ये हिस्सा दिला जातो. यानंतर या शेअर्सचा व्यवहार स्टॉक एक्स्चेंजवर होतो. आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. या खात्यात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. आयपीओच्या किंमतीशी संबंधित काही माहिती भरल्यानंतर हा पर्याय निवडणे लागू केले जाऊ शकते.
एसबीआय कार्ड बद्दल ?
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड हे एसबीआयचे क्रेडिट कार्ड युनिट आहे. एसबीआय कार्डमध्ये देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची 74 टक्के भागीदारी आहे. उर्वरित 26 टक्के कंपनी अमेरिकन इक्विटी कंपनी कार्लाईल ग्रुपकडे आहे. क्रेडिट कार्ड बाजारात एसबीआयचा 18 टक्के वाटा आहे. एसबीआय कार्ड 9.46 दशलक्ष क्रेडिट कार्ड्ससह देशातील दुसरे सर्वात मोठे क्रेडिट कार्ड जारी करणारे बँक आहे. दरम्यान, एसबीआय कार्डच्या आयपीओसाठी आपल्या अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, आयबीसीटीसीपेक्षा एबीसीआय कार्डचा आयपीओ अधिक यशस्वी होईल.