सावधान ! तुमच्या बँक अकाउंटवर मोबाईल हॅकर्सची ‘नजर’, बचावासाठी SBI नं सांगितल्या ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या या काळात ऑनलाईन फ्रॉड केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. याच कारणामुळे देशातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना सतत सतर्कतेचा इशारा देत आहे. SBI ने एक ट्विट करत ग्राहकांना मोबाईलद्वारे कशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते याबद्दलचा इशारा दिला आहे. सोबत यातून सुटण्याचा मार्ग देखील सांगितला आहे. आपल्या मोबाईल मध्ये वैयक्तिक माहिती तसेच बँकेचे डिटेल्स असू शकतात. तुम्हाला हेच धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

SBI ने ट्विट मध्ये लिहिलं आहे की, मोबाईल हॅकर्स चा शिकार बनू नका, तुमच्या डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी काही स्मार्ट पद्धतींचा वापर करा.

या तर जाणून घेऊ, तुमच्या फोनला हॅकर्स पासून वाचवायचं असेल तर काय करावं लागेल

1. तुमचा मोबाईल सार्वजनिक ठिकाणी विसरू नका

2. मोबाईलमधील ऍप्लिकेशन वापरून झाल्यावर ते बंद करा.

3. अनोळखी नेटवर्कशी तुमचा मोबाईल जोडू नका.

4. यूजरनेम आणि पासवर्ड मोबाइलमध्ये सेव्ह करू नका.

5. व्हायरस डेटा दुसऱ्या स्मार्टफोन मध्ये पाठवू नका.

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

1. तुमचा स्मार्टफोन डेटा नेहमी बॅकअप करत राहा.

2. तुमच्या फोनचा 15 अंकी आयएमइआय नंबर नेहमी सोबत ठेवा.

3. लॉक स्क्रीनचा वापर करा.

4. कोणत्याही मोबाईलमध्ये डेटा पाठवण्याआधी लेटेस्ट अँटीव्हायरसने चेक करा.

5. मोबाईल वेळोवेळी अपडेट करत राहा.

याआधी एसबीआयने आपल्या ग्राहकांना अनोळखी चार्जिंग स्टेशनवर तुमचा फोन चार्ज करू नका अशी सूचना दिली होती. आधी चौकशी करून घेण्याचा सल्ला देखील दिला होता.