कामाची गोष्ट ! तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर जाणून घ्या, बँकेनं दिली ‘ही’ खास माहिती

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   स्टेट बँक ऑफ इंडियाने रविवारी स्पष्टीकरण दिले की, ते योनो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना आपत्कालीन कर्ज देत नाहीत. दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये म्हंटले गेले होते कि, देशातील सर्वात मोठी बँक केवळ 45 मिनिटांत 5 लाख रुपयांपर्यंत आपत्कालीन कर्ज पुरवते. या अहवालांमध्ये असे म्हटले होते की एसबीआय हे कर्ज 10.5% व्याजदराने देत आहे आणि ग्राहकांना पहिल्या 6 महिन्यांपर्यंत कोणतीही ईएमआय देण्याची गरज नाही.

काय म्हणाले एसबीआय ?

रविवारी एसबीआयने एक निवेदन जारी करत म्हटले की, ‘काही अहवालात योनो प्लॅटफॉर्मद्वारे एसबीआयची आपातकालीन कर्ज योजना उपलब्ध करुन देण्यात येईल. आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की सध्या एसबीआय कोणतीही अशी कर्ज योजना चालवित नाही. आम्ही आमच्या ग्राहकांना अशा प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याची विनंती करतो.

पूर्व-मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्जाची सुविधा

दरम्यान, एसबीआयने अशीही माहिती दिली की, ते योनो प्लॅटफॉर्मद्वारे पूर्व-मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्ज प्रदान करीत आहेत. बँकेने म्हटले आहे की कोविड -19 संकटच्या पार्श्वभूमीवर पगाराच्या ग्राहकांना रोख रक्कम संपू नये म्हणून ही सुविधा पुरविली जात आहे. दरम्यान, योनो म्हणजे ‘यु ओन्ली नीड वन’. योनो हे एसबीआयचे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे ग्राहकांना बँकिंग, खरेदी, जीवनशैली आणि गुंतवणूकीची आवश्यकता प्रदान करते.

एमसीएलआरमध्ये 0.15% कपात

तसेच, अलीकडेच गृह कर्जावरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर व्याजदर 7.40 टक्क्यांवरून 7.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. नवीन दरही आजपासून लागू झाले आहेत. बँकेने एमसीएलआरमध्ये सलग 12 वे आणि आर्थिक वर्ष 2020-21 मधील दुसरी घट केली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये एसबीआयने व्याजदरात 0.35 टक्क्यांनी कपात केली.

किती वाचेल ईएमआय

एसबीआयच्या या निर्णयामुळे एमसीएलआर आधारित घर घेणाऱ्या ग्राहकांना किरकोळ दिलासा मिळणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी एसबीआयकडून 25 लाख रुपयांचे एमसीएलआर आधारित कर्ज घेतले असेल तर दर महिन्याला त्यांची ईएमआयमध्ये 255 रुपयांची बचत होईल.