पदवीधरांसाठी वर्षाच्या सुरवातीलाच खुशखबर ! स्टेट बँकेत 8 हजार जागांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची मोठी चिंता देशभरातील तरुणांमध्ये असताना नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर असणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदासाठी 8 हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीचा अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. कोणत्याही पदवी शाखेतून पदवी घेणारा उमेदवार हा अर्ज भरु शकतो. यासाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 865 जागा भरल्या जाणार आहेत.

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जदार माहिती मिळवून अर्ज भरु शकतात. बँकेतील कस्टमर सपोर्ट आणि सेल्स विभागासाठी कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2020 असेल. अर्जदार ऑनलाइल पद्धतीने अर्जाचे शुल्क भरू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटवर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज भरु शकतात. अर्जदार फक्त एकाच राज्यातून अर्ज भरु शकतो.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 26 जानेवारी 2020
पूर्व परिक्षा – फेब्रुवारी किंवा मार्च
मुख्य परिक्षा – 19 एप्रिल 2020

रिक्त जागा –
देशभरात एकूण 8 हजार जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातून सर्वाधिक 865 जागा भरल्या जाणार आहेत. तर मध्यप्रदेश 510, छत्तीसगढ 190, दिल्ली 143, राजस्थान 500, बिहार 230, झारखंड 45 व इतर राज्यातील रिक्त जागांवर ही भरती होईल.

पात्रता –
कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त पदवीधर अर्ज करु शकतो. पात्रतेचे निकष 1 जानेवारी 2020 पूर्वी पूर्ण केलेले असावे. त्यानंतरच्या उमेदवारांना पात्र मानले जाणार नाही.
वय –
अर्जदाराचे वय किमान 20 पूर्ण असावे, तर कमाल वय 28 वर्ष असावे. 1 जानेवारी 2020 ही तारीख आधार मानण्यात आली आहे. म्हणजेच 2 जानेवारी 1992 च्या आधी किंवा 1 जानेवारी 2020 नंतर जन्मलेले अर्जदार अर्ज करु शकणार नाहीत. एससी, एसटी उमेदवारांसाठी वयाची अट 5 वर्ष तर ओबीसींसाठी 3 वर्ष शिथील करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/