SBI Credit Card | SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांना दणका ! आता ‘हे’ ट्रान्झॅक्शन महागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SBI Credit Card | जगात प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा ऑनलाइन व्यवहार (Credit card) करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. कोरोना काळात तर याचे प्रमाण प्रचंड वाढले. याचबरोबर क्रेडिट कार्डचा वापर देखील अनेक लोक करत आहेत. म्हणजेच कोणत्याही वस्तुची खरेदी केल्यानंतर त्या वस्तुचे पैसे ईएमआय च्या स्वरुपात भरण्याची परवानगी असते. मात्र, SBI क्रेडिट कार्ड वापरणा-यांसाठी (SBI Cardholder) एक धक्का निर्माण झाला आहे. आता एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे (SBI Credit Card) केल्या जाणाऱ्या ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. असं SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जारी केलं आहे.

 

व्याज शुल्काव्यतिरिक्त भरावे लागणार प्रक्रिया फी –

 

हा नवा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. या नव्या नियमांनूसार EMI व्यवहारांसाठी (EMI Transactions) आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क सहीत त्यावरील कर भरावा लागणार आहे.
तर, .कंपनीने आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन शुल्काची माहिती दिली आहे.
व्याज शुल्काशिवाय भरावे लागणार प्रक्रिया शुल्क SBICPSL कडून रिटेल आउटलेट्स, अ‍ॅमेझॉन तसेच फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स (E-commerce) वेबसाइटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.
या फि खरेदीचे EMI मध्ये रूपांतर केल्यानंतर जे व्याज आकारले जाणार आहे.

 

प्रक्रिया फी बघा –

 

दरम्यान, प्रक्रिया शुल्क EMI मध्ये यशस्वीरित्या रुपांतरित झालेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क लागू आहे.
क्रेडिट कार्डद्वारे 1 डिसेंबरपूर्वी केलेल्या कोणत्याही व्यवहारास या प्रोसेसिंग फीमधून सूट दिली जाणार आहे.
रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना (SBI Cardholder) EMI व्यवहारांवरील प्रक्रिया फिची माहिती चार्ज स्लिपच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
तसेच. ऑनलाइन EMI व्यवहारांसाठी, कंपनी पेमेंट पेजवर प्रोसेसिंग फीची माहिती देईल.
EMI व्यवहार रद्द झाल्यास, प्रक्रिया फि परत केले जाईल.
आणि प्री-क्लोजरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही.
EMI मध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट लागू होणार नाही.

 

Web Title : sbi credit card news alert from 1st december emis for your sbi credit card purchases be ready to pay rs 99 plus taxes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rohit Sharma | रोहित शर्माची आज पहिली परीक्षा, ‘या’ 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार ‘हिटमॅन’

Kranti Redkar | शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी क्रांती रेडकरने केलं ट्वीट; म्हणाली…

Pune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !