SBI Credit Card ग्राहकांसाठी वाईट परंतु महत्वाची बातमी, जाणून घेतले तर होईल फायदा

0
168
SBI Credit Card | sbi credit card to charge rs 99 with taxes for emi purchases starting december 1
File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) च्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे, परंतु ती महत्वाची सुद्धा आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने (SBI Credit Card) ग्राहकांना ईमेलच्या माध्यमातून सूचना दिली आहे की, 1 डिसेंबर 2021 पासून सर्व ईएमआय खरेदी व्यवहारावर 99 रुपये प्रोसेसिंग फी आणि टॅक्स लावला जाईल.

 

कंपनी रिटेल आऊलेटसह Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर करण्यात आलेल्या सर्व ईएमआय ट्राजक्शन (EMI transactions) साठी प्रोसेसिंग फी चार्ज करेल.
हे शुल्क खरेदी ईएमआय (EMI) मध्ये बदलल्यावर लागणार्‍या व्याज शुल्काच्या (Interest charges) अतिरिक्त आहे.

 

BNPL च्या अंतर्गत महाग होतील वस्तू

 

सध्या अनेक मर्चंट वेबसाइट ‘बाय नाउ पे लेटर’ (BNPL) चा ऑपशन देत आहेत.
हे शुल्क या पर्यायाच्या अंतर्गत खरेदी करणार्‍या कार्ड-होल्डरला आवश्य प्रभावित करेल.
हे एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून BNPL खरेदी आणखी महाग करणार आहे.

 

क्रेडिट कार्ड कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये म्हटले आहे की – प्रिय कार्डधारक, आम्ही आपल्याला सूचित करतो की,
1 डिसेंबर 2021 पासून सर्व मर्चंट आऊटलेट/वेबसाइट/अ‍ॅप्सवर करण्यात आलेल्या सर्व ईएमआय व्यवहारांवर प्रोसेसिंग शुल्क म्हणून 99 रुपये + टॅक्स (जो लागू असेल) घेतले जाईल. (SBI Credit Card )

 

प्रोसिसिंग चार्जबाबत मिळेल माहिती

 

प्रोसिसिंग चार्ज ईएमआयमध्ये परिवर्तित ट्रांजक्शनवर लागू होतात. आता नवीन नियमानुसार, 1 डिसेंबरपूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही ट्रांजक्शनवर या प्रोसिसिंग चार्जमधून सूट दिली जाईल.
कंपनी रिटेल आऊटलेटवर खरेदी करताना चार्ज स्लिपच्या माध्यमातून कार्डधारकांना ईएमआय ट्रांजक्शनवर प्रोसिसिंग चार्जबाबत सांगेल.

 

ट्रांजक्शन कॅन्सल झाल्यास परत मिळेल का फी?

 

या विषयात ऑनलाइन ईएमआय ट्रांजक्शनसाठी कंपनी पेमेंट पेजवर प्रोसिसिंग चार्जबाबत माहिती देईल.
जर तुमचे ईएमआय ट्रांजक्शन कॅन्सल झाले तर प्रोसेसिंग फी परत केली जाईल. मात्र, प्री-क्लोजरच्या स्थितीत ती परत केली जाणार नाही.
इतकेच नव्हे, ईएमआयमध्ये कन्व्हर्टेड ट्रांजक्शनसाठी रिव्हॉर्ड पॉईंट लागू होणार नाहीत.

 

Web Title : SBI Credit Card | sbi credit card to charge rs 99 with taxes for emi purchases starting december 1

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagpur Crime | धक्कादायक ! नागपूरमध्ये महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या

Pune Crime | फ्लॅटच्या व्यवहारातून वाद, शिवसेनेच्या नगरसेवकावर फसवणुकीचा FIR

Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात