SBI Customer Alert Message | SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाचा मेसेज ! चुकूनही करू नका ‘ही’ 3 कामे, जाणून घ्या बँकेने काय म्हटले?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय स्टेट बँक म्हणजे एसबीआयने आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी एक अलर्ट मेसेज (SBI Customer Alert Message) जारी केला आहे. एसबीआयने KYC च्या नावावर होणार्‍या फ्रॉडबाबत सावध केले आहे. बँकेने ट्विटरद्वारे आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार नो युअर कस्टमर म्हणजे केवायसी व्हेरिफिकेशनच्या (KYC verification) नावार लोकांना गंडा घालत आहेत. एसबीआयच्या (SBI) सर्व ग्राहकांना 30 जूनपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे, जर एखाद्या ग्राहकाने केवायसी केले नाही तर त्याचे बँक अकाऊंट सस्पेंड होऊ शकते. SBI Customer Alert Message | sbi importance notice for customers about kyc and online fraud check full details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जाणून घ्या एसबीआयने काय म्हटले?

बँकेनुसार, सायबर गुन्हेगार (Cyber criminals) तुमच्या पर्सनल डिटेल घेण्यासाठी बँक/कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवतात, आणि एक मेसेज पाठवला जातो. या मेसेजच्या भानगडीत ग्राहकांनी अजिबात पडू नये आणि केवायसीसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. सोबतच जर एखाद्या ग्राहकाच्या बाबतीत असे घडले तर याची माहिती ताबडतोब सायबर क्राइमला द्यावी.

बँकेने काय म्हटले…

1. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

2. बँक केवायसी अपडेटसाठी कधीही लिंक पाठवत नाही.

3. कुणाशीही आपला मोबाइल नंबर आणि पर्सनल माहिती शेयर करू नका.

Post Office मध्ये FD करणार्‍यांनी लक्ष द्यावे, आकर्षक व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे, येथे जाणून घ्या

घरबसल्या असे अपडेट करा KYC

कोरोना महामारी दरम्यान एसबीआयने आपल्या खातेधारकांना केवायसी डॉक्युमेंट ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा दिली होती. केवायसी अपडेटसाठी कस्टमरकडून आपला अ‍ॅड्रेस प्रूफ आणि ओळखपत्र रजिस्टर्ड ईमेल किंवा पोस्टद्वारे पाठवावे लागेल. तुम्ही त्याच ईमेल आयडीद्वारे आपले डॉक्यूमेंट पाठवा, जो तुम्ही बँकेत अपडेट केलेला आहे. त्या ईमेलवरून बँकेच्या ब्रँचच्या ईमेल अ‍ॅड्रेसवर कागदपत्रांची स्कॅन कॉपी पाठवावी लागेल.

Web Title : SBI Customer Alert Message | sbi importance notice for customers about kyc and online fraud check full details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी