‘या’ बँकेचे ग्राहक आहेत सर्वाधिक त्रस्त, तक्रारींमध्ये तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक SBI ची डिजिटल सेवा सुरु झाली झाली. या ऑनलाईन सुविधेचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून होताना दिसतो आहे. असे असले तरी SBI बाबतच्या तक्रारींमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत SBIच्या तक्रारींमध्ये तब्बल २५ टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती एका वृत्तसमूहाने दिली आहे.

बँकिंग क्षेत्रातील लोकपाल नुसार जून २०१८चे वर्ष संपताना ग्राहकांकडून १. ६३ लाख लोकांच्या तक्रारी मिळाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या संख्येत २५ टक्के वाढ झाली आहे. यापैकी सर्वाधिक तक्रारी चुकीच्या व्यवहार झाल्याशी संबंधित आहेत.

रिझर्व बँकेने बुधवारी याबाबत माहिती दिली. यात सर्वाधिक ४७,००० तक्रारी एकट्या SBI विरोधातल्या आहेत. रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार २१ बँकिंग लोक तक्रार निवारण कार्यालयांना १,६३,५९० तक्रारी मिळाल्या आहेत. या तक्रारी मागील वर्षापेक्षा २४.९ टक्के अधिक आहे. यापैकी ९६ टक्के तक्रारीचे निवारण झाले आहे.

१. ६३ लाखांच्या तक्रारींची नोंदणी

१) एसबीआय (SBI) – ४७०००
२) एचडीएफसी (HDFC) – १२०००
३) सिटी बँक (Citi Bank)- १४५०

या तक्रारींचा समावेश

पेन्शनच्या तक्रारी , सूचना देण्यापूर्वी शुल्क लावणे , चुकीची माहिती देणे याबाबतीतल्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये २२. १ टक्के चुकीचे व्यवहार, १५. १ टक्के एटीएम आणि डेबिट कार्ड, ७. ७ टक्के क्रेडिट कार्ड याच्याशी संबंधित आहे. तर मोबाईल आणि इलेकट्रोनिक बँकिंग च्या ५.२ टक्के तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.