SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) चे ग्राहक आहात तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचे पॅन कार्ड (PAN Card) 10 दिवसानंतर काम करणे बंद होईल. सोबतच बचत खात्यावर वाईट परिणाम होईल. एसबीआयने SBI आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केले आहे. बँकेने सावध केले आहे की, 30 जूनच्या पूर्वी ग्राहकांनी आपले PAN आणि आधार (Aadhaar) लिंक करावे. अन्यथा ट्रांजक्शनमध्ये अडचणी येऊ शकतात, बचत खाते सुद्धा प्रभावित होईल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

एसबीआयने ट्विट SBI Tweet करून आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की, आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे.
जर पॅन आणि आधारला लिंक केले नाही तर पॅन इनअ‍ॅक्टिव्ह होईल आणि ग्राहकांना ट्रांजक्शनमध्ये अडचणी येईल.
पॅन आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.
एसबीआयने ट्विट करत माहिती दिली की, आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे.

जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी एयरटेलने लाँच केला आकर्षक प्लॅन, मिळवा इतक्या महिन्यापर्यंत आता सर्वकाही ‘फ्री’

जर पॅन आणि आधार ठरलेल्या कालावधीत 30 जूनपर्यंत लिंक केले नाही तर पॅन इनअ‍ॅक्टिव्ह होईल आणि ग्राहकांना ट्रांजक्शनमध्ये अडचणी येईल.
यानंतर ग्राहक आपले पैसे काढू शकणार नाही.
सोबतच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही.
पॅन कार्डशी आधार लिंक केले नाही तर कलम-234क च्या अंतर्गत तुमच्यावर कमाल 1,000 रुपयांचा दंड लागू शकतो.

तर, बँकेने आपल्या ग्राहकांना आवाहन केले आहे की, ते घरबसल्या ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता. एसबीआयने म्हटले की, ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी ब्रँचमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. केवायसी अपडेशनसाठी आवश्यक डॉक्यूमेंट पोस्टाने किंवा मेलद्वारे पाठवल्यास स्वीकारले जाऊ शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : sbi customer must linking aadhar pan otherwise your account will be block know about it

हे देखील वाचा

BJP Kirit Somaiya | आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची किरीट सोमय्यांची पोलिसात तक्रार

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?