SBI Customers Alert : बँकेच्या उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा बदलल्या, आता केवळ 4 कामे होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. यामुळे अनेक लोकांची बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या भयानक संकटापासून बचावासाठी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी भारतातील एक नामांकित असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) काहीतरी निर्णय घेत असते. यावरून बँकेने आता आपल्या असणाऱ्या शाखा उघडणे आणि बंद करणे यासाठी टाईमिंग मध्ये बदल केलं आहे. तसेच शाखेच्या वेळेशिवाय बँकेमध्ये ठराविक ४ कामे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनकडून जारी केल्या गेलेल्या सूचनांनुसार म्हटलं आहे की, ग्राहकांना अतिशय आवश्यक काम असेल तर त्यांनी बँकेमध्ये यावे. तसेच याव्यतिरिक्त ग्राहकांनी ३१ मे पर्यंत सकाळी १० ते १ या वेळेतच बँकेत यावे. तसेच, दुपारी २ वाजता बँकेच्या सर्व शाखेतील कामकाज बंद होणार असल्याचे बँकेकडून ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. तसेच, बँकेत प्रशासनिक कार्यालयं ५० % कर्मचाऱ्यांसह पहिल्याप्रमाणे पूर्ण बँकिंगच्या वेळेत उपलब्ध राहणार आहे.

बँकेच्या सूचनेनुसार सांगण्यात आलं आहे कि, बँकेत येणारे ग्राहक मास्क घालून यावे, नाहीतर बँकेत घेतले जाणार नाही. जी ४ कामे बँक करणार आहे त्यामध्ये रोख रक्कम काढणं अथवा भरणं, चेकशी निगडीत कामं, DD-RTGS-NEFT शी निगडीत कामं आणि सरकारी चालान इतकीचं कामं केली जाणार आहे. तसेच ग्राहकांना फोन बँकिंग सेवेचा फायदा घेता येणार आहे. चेकबुक देखील घरातूनच मागवता येणार आहे. फोन बँकिंग सुविधेला प्रारंभ करण्याआधी ग्राहकांना रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहकांना पासवर्ड तयार करावा लागतो. तर ग्राहक संपर्क केंद्राच्या द्वारे फोनवर बँकेशी संबंधित असणारी माहिती मिळवू शकतो. असे बँकेकडून सांगण्यात आलं आहे.