ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

SBI Customers Alert | ‘एसबीआय’च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे ! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गाईडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Customers Alert | एटीएमद्वारे फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने (SBI) एक मोठे अपडेट केले आहे, जे सर्व ग्राहकांनी जाणून घेणे खुप आवश्यक आहे. एसबीआयने आपली एटीएम ऑपरेशन सिक्युरिटी अपग्रेड करण्यासाठी हे महत्वाचे अपडेट केले आहे. जर तुम्हाला ATM मधून कोणत्याही त्रासाशिवाय पैसे काढायचे असतील तर ही बातमी पूर्ण वाचा, ज्यामुळे सहजपणे एटीएममधून पैसे काढता येतील. (SBI Customers Alert)

आता एसबीआय ग्राहकांना एटीएममधून पैसे काढताना एका ठराविक रक्कमेनंतर बँकेत रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल, जो एटीएम मशीनमध्ये टाईप केल्यानंतर पैसे काढता येतील. मात्र, 9,900 किंवा यापेक्षा कमी पैसे काढणार्‍या ग्राहकांना ओटीपीची आवश्यकता नाही.

10 हजार किंवा यापेक्षा जास्त पैसे काढताना खालील स्टेपचा वापर करा :

– एसबीआय ATM मधून रोकड काढण्यासाठी एक ओटीपी (OTP) ची गरज असेल.

यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

हा ओटीपी एक चार अंकाचा क्रमांक असेल जो ग्राहकांना सिंगल ट्राजक्शनसाठी मिळेल.

रक्कम नोंदवल्यानंतर, एटीएम स्क्रीनवर ओटीपी टाकण्यास सांगितले जाईल.

कॅश काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेसोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर प्राप्त ओटीपी नोंदवावा लागेल.

 

Web Title :- SBI Customers Alert | sbi customers alert new atm withdrawal guidelines with otp you should must know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hemant Rasne | पुण्यातील मध्यवर्ती पेठांतील रस्ते 20 जानेवारीपर्यंत पूर्ववत होणार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Omicron Covid Variant in Pune | नायजेरियातून पिंपरीत आलेल्या आणखी 4 जणांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड

 

Back to top button