SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा

नवी दिल्ली : SBI Customers Alert | देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्वाची सूचना (SBI Important Notice) जारी केली आहे. बँकने ट्विट करत आपल्या ग्राहकांना अलर्ट (SBI Customers Alert) केले आहे, आणि त्यांना गरजेनुसार बँकिंगसंबंधी कामे उरकून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्वाची सूचना करत म्हटले आहे की, बँकेच्या काही महत्वाच्या सेवा उद्या बंद (SBI Services) राहतील.

 

एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवा ग्राहकांसाठी शनिवार-रविवारच्या रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 4.30 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही. यासाठी तुम्ही 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी आपली ऑनलाईन बँकिंगची कामे उरकून घ्यावी. (SBI Customers Alert)

 

 

बँकेने ट्विट करून दिली माहिती

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, टेक्नोलॉजी अपग्रेडेशनचे काम वरील कालावधीत केले जाईल. एसबीआयच्या ऑनलाइन बँकिंग सर्व्हिसेस, ज्यामध्ये INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI चा समावेश आहे. या असुविधेसाठी दिलगीर आहोत. (SBI Customers Alert)

 

एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगच्या सेवेचा वापर आठ कोटीपेक्षा जास्त आणि मोबाईल बँकिंगचा वापर सुमारे दोन कोटी लोक करतात. तर Yono वर रजिस्टर्ड ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर रोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात. एसबीआय देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आणि 57,889 पेक्षा जास्त एटीएमसह सर्वात मोठे नेटवर्क आहे.

 

Web Title :- SBI Customers Alert | sbi internet banking yono yono lite upi like facilities will remain closed on tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Keshav Upadhye | केशव उपाध्ये यांचा खा. सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले – ‘ताई, मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या’

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

Anemia | शरीरात रक्ताची कमतरता? वेगाने रक्त तयार करू शकतात खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, जाणून घ्या