SBI Customers Alert | एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज रात्रीपासून बंद राहील ‘ही’ सर्व्हिस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Customers Alert | तुमचे खातेही एसबीआय (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शुक्रवारी रात्री आपल्या ग्राहकांसाठी माहिती जारी केली आहे. (SBI Customers Alert)
उद्या सकाळी 6 वाजता सुरू होईल पोर्टल
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे पोर्टल https://crcf.sbi.co.in शुक्रवारी म्हणजे 26 फेब्रुवारी रात्री 11 ते 27 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहील. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे पोर्टल तक्रारी/रिक्वेस्ट/इन्क्वॉयरी इत्यादींसाठी वापरले जाते.
एसबीआयने केले ट्विट
याबाबत शुक्रवारी रात्री एसबीआयकडून ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, बँकेचे पोर्टल https://crcf.sbi.co.in शेड्यूल मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 27 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत काम करणार नाही. (SBI Customers Alert)
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/pNpiQ5tQUO
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 25, 2022
येथे करू शकता तक्रार
मात्र, या काळात, बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारी इत्यादी घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊ शकता. तक्रारीच्या बाबतीत रजिस्ट्रेशन आणि तुम्ही अनधिकृत व्यवहारांची तक्रार 1800112211/18001234/18002100 या टोल फ्री क्रमांकावर करू शकता.
Web Title :- SBI Customers Alert | sbi update for customers you can not able to use crcf portal
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update