SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे, ‘या’ दिवसानंतर बंद होईल खाते; जाणून घ्या सर्व्हिस सुरू ठेवण्यासाठी काय करावे?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | स्टेट बँक (State Bank of India) खातेधारकांना वारंवार पॅन-आधार लिंक करण्याचे आवाहन करत आहे. SBI ने पुन्हा ग्राहकांना याबाबत आवाहन केले आहे. पॅन-आधार लिंकिंग (PAN-Aadhaar Linking) ची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. बँकेने म्हटले आहे की, जर तुम्ही हे काम ठरलेल्या कालावधीत केले नाही तर तुमची बँकिंग सेवा बाधित होऊ शकते.
काय म्हटले बँकेने…
भारतीय स्टेट बँकेने म्हटले की, जर आधार-पॅन लिंक नसेल तर पॅन नंबर निष्क्रिय होईल. यासाठी बँकेने लिकिंगचे आवाहन केले आहे. हे अनिवार्य आहे. यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे.
एसबीआय बँक अकाऊंट होईल सस्पेंड
विना KYC बँक अकाऊंट सस्पेंड झाले तर अकाऊंटमध्ये जमा पैसे फ्रीज होतील.
हे पैसे तुम्ही काढू शकणार नाही.
तसेच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि कोणतीही सबसिडी मिळणार नाही.
पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया
1- यासाठी पहिली पद्धत SMS आणि दुसरी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन करू शकता.
2- एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी UIDPAN < स्पेस 12 अंकी आधार नंबर < स्पेस10 अंकी पॅन नंबर आणि 567678 किंवा 56161 वर एसएमएस करा.
Web Title : sbi customers bank account will be closed after 30 september check why details here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही मागणी केल्यानं आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?
Ajit Pawar | कोरोना संसर्गाची तिसरी लाट ‘या’ महिन्यात येऊ शकते; अजित पवार म्हणाले…
Maharashtra Police | राज्यातील ‘या’ 67 पोलीस अधिकारी-अंमलदाराना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर