खुशखबर ! SBI च्या ग्राहकांना पैसे कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, घरबसल्या अशी होणार दरमहा ‘कमाई’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना एन्युटी डिपॉजिट स्कीम दिली आहे, ज्याअंगर्तत प्रत्येक महिन्याला एक फिक्स्ड इन्कम होते. एसबीयची ही खास स्कीम त्या लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या सेव्हिंगच्या मदतीने दर महिन्याला ठराविक इन्कम हवे आहे. जाणून घेवूयात या स्कीमअंतर्गत मिळणारे व्याज आणि कालावधीसह इतर महत्वाची माहिती…

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या स्कीममध्ये डिपॉजिटर्सला प्रत्येक महिन्याला इक्वेटेड मंथली इन्कम (ईएमआय) म्हणजे ठरलेली रक्कम दिली जाते. यामध्ये प्रिन्सिपल अमाउन्टसह व्याजसुद्धा असते. अशाप्रकारे खातेधारकाला त्याच्या डिपॉजिटसह व्याजसुद्धा मिळते. यामध्ये डिपॉजिट जमा केल्यानंतर पुढील महिन्यापासून बँक व्याज देण्यास सुरूवात करते. समजा या स्कीमअंतर्गत 28 फेब्रुवारीला डिपॉजिट जमा केले असेल तर त्यावर तुम्हाला 27 मार्चपासून डिपॉजिट मिळणे सुरू होईल.

किती करावे लागेल डिपॉजिट ?
एसबीआयच्या एन्युटी डिपॉजिट स्कीमअंतर्गत कमाल डिपॉजिटची मर्यादा नाही. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकाला किमान 25 हजार रुपये या स्कीम अंतर्गत डिपॉजिट करणे अनिवार्य आहे.

किती मिळणार व्याज ?
या स्कीमवर मिळणारे व्याज फिक्स्ड किंवा टर्म डिपॉजिट एवढेच असते. सोबतच, हे यावर अवलंबून आहे की, या स्कीमसाठी डिपॉजिटर कोणता कालावधी निवडतो. नुकत्याच रिवाईज्ड व्याज दरानंतर, 1 ते 10 वर्षासाठी मॅच्युअर होणार्‍या एफडीवर ही बँक 6 टक्के दराने व्याज देते. 36 महीने, 60 महीने, 84 महीने किंवा 120 महिन्यासाठी एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीमवर 6 टक्के दराने व्याज मिळेल.

कालावधी
एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीममध्ये ग्राहकांना अनेक मॅच्युरिटी पीरियडचा पर्याय मिळतो. डिपॉजिटर्सकडे पर्याय असतो की, तो 3 ते 5 वर्ष, 7 वर्ष आणि 10 वर्षांच्या पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.

प्रीमॅच्युअर पेमेन्ट
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एसबीआय एन्युटी डिपॉजिट स्कीममध्ये प्रीमॅच्युरिटी पेमन्ट केवळ डिपॉजिटरच्या मृत्यूनंतर मिळू शकते.

अन्य सुविधा
या स्कीम अंतर्गत डिपॉजिटर्सला नॉमिनेशनची सुविधा मिळते. डिपॉजिटर म्हणून तुम्हाला ओव्हरड्राफ्ट किंवा कर्जाची सुविधा सुद्धा मिळते. कर्जाची रक्कम डिपॉजिटच्या रक्कमेच्या 75 टक्केपर्यात असू शकते.