SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘या’ व्यवहारांवर आता चार्जेस लागणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एसबीआयमध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यवहार केल्यानंतर त्यावर चार्जेस द्यावे लागायचे. आता तुम्हाला बँकेत पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर चार्जेस पडणार नाहीत. एसबीआय बँकेने RBIचा निर्णय अमलात आणला आहे. त्यामुळे आता एसबीआय RTGS आणि NEFT चार्जेस काढून टाकण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सामान्य जनतेसाठी RTGS आणि NEFT न घेण्याची मोठी घोषणा केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे इंटरनेट बँकिंग स्वस्त होणार आहे. त्यामुळे आरबीआयने या निर्णयाचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास सांगितले आहे. त्यामुळेच एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०१९ पासून एसबीआयने RTGS आणि NEFT चार्जेस रद्द केले आहे.

RTGS (Real-time gross settlement) लाखो रुपये ट्रान्सफर करायचं उत्तम माध्यम आहे. यात काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करता येतात. तर NEFT (National electronic funds transfer ) मध्ये ठराविक वेळीच आणि वेळेत पैसे ट्रान्सफर होतात. या व्यवहारांचे RBI बँकांकडून हे दर घेत होती, पण आता ते घेणार नाही. त्यामुळे ग्राहकांना फक्त बँक जे दर आकारेल तेच द्यावे लागणार आहे. त्यामुळे RTGS आणि NEFT करणे ग्राहकांसाठी स्वस्त होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान