SBI customers | खुशखबर ! SBI च्या या खातेधारकांना मोफत मिळताहेत 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही State Bank of India चे ग्राहक (SBI customers) असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. SBI आपल्या ग्राहकांना (SBI customers) 2 लाख रुपयांपर्यंत मोफत इन्श्युरन्स (Free insurance) देत आहे. बँक, ही सुविधा जनधन अकाऊंट (Jan Dhan Accounts) च्या खातेधारकांना देत आहे. एसबीआय ज्या ग्राहकांकडे रुपे (RuPay) डेबिट कार्ड आहे, त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत आकस्मित विमा कव्हर देते. रूपे डेबिट कार्डचा (Debit card) वापर करणार्यांना मृत्यू विमा, खरेदी सुरक्षा कव्हर आणि इतर लाभ मिळतात. जनधन अकाऊंट खातेधारक मोफत इन्शुरन्स लाभ घेऊ शकतात. SBI customers | state bank of india giving 2 lakh rupees benefit to jandhan account holders know about it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
2014 मध्ये सुरू झाली होती योजना
जनधन योजना 2014 मध्ये सुरू झाली होती. गरीब लोकांना परवडणार्या आर्थिक सेवा, बँकिंग बचत आणि जमा खाते, क्रेडिट, विमा, पेन्शन इत्यादी सुविधा दिल्या जातात.
कुणीही व्यक्ती केवायसी कागदपत्रे देऊन ऑनलाइन जनधन खाते उघडू शकतो.
–
ट्रान्सफर करण्याचा सुद्धा आहे पर्याय
कोणत्याही जुन्या बचत खात्याला जनधन खाते करणे खुप सोपे आहे.
सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या शाखेत जा. तिथे एक फॉर्म घेऊन भरा.
नंतर आपल्या खात्यासाठी रुपे कार्डसाठी अर्ज करा. तो भरल्यानंतर बँकेत जमा करा.
यानंतर तुमचे खाते जनधन खात्यात बदलले जाईल.
28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यांवर जारी रूपे कार्डची विमा रक्कम 1 रूपये असेल.
तर 28 ऑगस्ट 2018 नंतर काढलेल्या रूपे कार्डवर 2 लाखापर्यंतचे अॅक्सिडेंटल बव्हर मिळेल.
असा करा क्लेम (Claim)
व्यक्तिगत दुर्घटनेनंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा रक्कमेनुसार भारतीय रुपयात क्लेमचे पैसे दिले जातील.
न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नॉमिनी बनू शकतो.
Web Title : SBI customers | state bank of india giving 2 lakh rupees benefit to jandhan account holders know about it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Income Tax Refund वर का मिळाले नाही व्याज?, जाणून घेण्याची ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत