खुशखबर ! उद्यापासून स्वस्त होणार SBI चं घर, वाहन आणि पर्सनल लोन, बँकेकडून सहाव्यांदा व्याजदरात कपात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने दिवाळीआधीच आपल्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे. 10 ऑक्टोबरपासून बँकेने MCLR दर 0.10 टक्के कमी केला आहे. त्यामुळे आता तुम्हाला याचा फायदा गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच वैयक्तिक कर्ज घेताना देखील होणार आहे. 4ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँकेने देखील रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची घट केली होती.

SBI ने दिले ग्राहकांना गिफ्ट
बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आलेल्या माहितीनुसार,ग्राहकांना फायदा होण्यासाठी MCLR मध्ये 0.10 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता MCLR दर हे 8.15 टक्क्यांवरून 8.05 टक्के होणार आहेत. हे नवीन दर 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

इतका असणार तुमचा हफ्ता
आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर आणि एसबीआयने दरामध्ये घाट केल्यानंतर आता महिन्याला तुमचा हफ्ता 0.10 टक्क्यांनी कमी होणार आहे. या दरांचा फायदा हा नवीन कर्ज घेतलेल्या ग्राहकांबरोबरच एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना देखील होणार आहे.

 

Visit : Policenama.com