आजपासुन SBI मध्ये बचतीवर कमी ‘फायदा’, अधिक ‘व्याजदर’ मिळवण्यासाठी ‘इथं’ करा गुंवतणूक, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता बँकांच्या व्याजदरांमध्ये देखील याचा फरक दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील 1 लाख रुपयांवरील रकमेवर व्याजदर कमी केले असून यापुढे साडेतीन टक्क्यांऐवजी आता केवळ सव्वातीन टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच अन्य बँकांनी देखील आपल्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. मात्र तुम्हाला यापेक्षा अधिक व्याजदर हवे असेल तर तुमच्यासाठी नवीन योजना आहे.
पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर 4 टक्के व्याजदर –
पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर तुम्हाला चार टक्के व्याजदर मिळणार असून कितीही रक्कम तुम्ही या बचत खात्यात जमा करू शकता. सरकारच्या वतीने हे चार टक्के व्याज देण्यात येत असून एसबीआयच्या तुलनेत 0.75 टक्के व्याजदर तुम्हाला या बचत खात्यावर मिळणार आहे.
हे फायदे मिळणार –
पोस्टातील या खात्यावर अन्य बँक खात्यांप्रमाणेच सुविधा मिळतात. इंटरनेट बँकिंग सारखी सुविधा देखील या बँक खात्यावर मिळत आहे. त्याचबरोबर तुम्ही घरबसल्या देखील या खात्याचे नियोजन करू शकता. पासबुक आणि एटीएम कार्डची सुविधा देखील तुम्हाला या खात्यावर मिळणार आहे.
सोपे आहे पोस्टात खाते उघडणे –
पोस्टात खाते उघडण्यासाठी तुम्हाला केवळ एक फॉर्म भरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इंटरनेट बँकिंगचा फॉर्मदेखील भरणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही ऍपच्या माध्यमातून देखील तुमच्या खात्याचे नियोजन करू शकता. तसेच केवायसी करणे देखील गरजेचे आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या