खुशखबर ! एसबीआय कडून (SBI) व्याजदारात लक्षणीय कपात

मुंबई : वृत्तसंस्था – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने व्याजदरात ०.०५ टक्के किरकोळ कपात केली आहे. एसबीआयने नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत.

एसबीआयने ८.५५ टक्के व्याजदरात कपात ०.०५ इतकी कपात करत ८.५० टक्के व्याजदर लागू केले आहेत. तर ३० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्याजदरात एसबीआयने ०.१० टक्के कपात केली आहे. यानुसार नवा व्याजदर ८.६० ते ८.९० टक्क्यापर्यंत असेल. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच आपल्या रोपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीनंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेने एक वर्ष किंवा त्याहून अधिक कलावाधी असलेल्या कर्जावरील व्याजदरात ०.०५ इतकी कपात केली आहे. त्यानुसार बँकेचा ८.६५ टक्के इतका नवा व्यजदर असेल.

रिझर्व्ह बँकेने त्यांच्या रेपोदरात कपात केली आहे. त्यामुळे आता कर्ज स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केल्यामुळे रेपो रेट 6.25 वरून 6.00 टक्क्यांवर आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे.