लाखो ग्राहकांना SBI ची मोठी भेट ! 10 जूनपासून ‘एवढ्या’ रूपयांनी कमी होईल तुमचा EMI

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) लागोपाठ 13व्या वेळी एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. एसबीआयने सोमवारी याबाबत माहिती देताना म्हटले की, नवीन दर 10 जून 2020 पासून लागू होतील. एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 25 आधार अंक म्हणजे 0.25 टक्के कपात केली आहे. यानंतर एक वर्षाचा एमसीएलआर घटून 7 टक्के झाला आहे.

यासोबतच, एसबीआयने बेस रेटमध्ये सुद्धा 75 आधार अंकांची कपात केली आहे. एसबीआयने एका वक्तव्यात म्हटले आहे की, या कपातीनंतर बेस रेट 8.15 टक्क्यांनी घटून 7.40 टक्के झाला आहे. हा सुद्धा 10 जूनपासून लागू करण्यात येईल.

या दरांमध्ये सुद्धा कपात

बँकेने सांगितले की, आरबीआयद्वारा व्याज दरात 40 आधार अंकांच्या कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना दिला जाईल. आरबीआयने मागील 22 मे रोजी व्याजदरात कपातीची घोषणा केली होती. एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) सुद्धा 40 आधार अंक घटेल. ईबीआर सध्या 7.05 टक्क्यांनी घटून 6.65 टक्के आणि आरएलएलआर सध्या 6.65 टक्क्यांनी घटून 6.25 टक्के होईल. बँकेने सांगितले की, ईबीआर 1 जुलैपासून लागू करण्यात येईल. तर आरएलएलआर 1 जूनपासून लागू करण्यात येईल.

किती घटणार तुमचा ईएमआय

एसबीआयद्वारे व्याज दरात कपातीचा फायदा कर्ज घेणार्‍या ग्राहकांना कमी ईएमआयच्या रूपात मिळेल. जर एखाद्या ग्राहकाने एसबीआयकडून 30 वर्षासाठी 25 लाख रुपयांचे लोन घेतले आहे तर एमसीएलआरमध्ये कपातीने प्रति महीना 421 रुपये कमी ईएमआय द्यावा लागेल. अशाप्रकारे जर एखाद्या ग्राहकाने ईबीआर/आएलएलआर लिंक्ड लोन घेतले आहे तर त्याच्या ईएमआयमध्ये प्रति महिना 660 रुपयेपर्यंत घट होईल.

काय आहे एमसीएलआर?

बँकांसाठी लेंडिंग इंटरेस्ट रेट ठरवण्यासाठी फार्म्युल्याचे नाव मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लेंडिंग रेट आहे. आरबीआयद्वारा बँकांसाठी ठरवलेला फार्म्यूला फंडच्या मार्जिनल कॉस्टवर आधारित आहे. या फार्म्युल्याचा उद्देश कस्टमरला कमी इंटरेस्ट रेटचा फायदा देणे आणि बँकांसाठी इंटरेस्ट रेट ठरवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आहे.