SBI Declare Dividend | SBI मध्ये इन्व्हेस्ट करणार्‍यांना प्रॉफिटच Profit, प्रत्येकाला मिळेल इतका डिव्हिडेंट!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI Declare Dividend | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India – SBI) च्या शेअर होल्डर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत बँकेने प्रचंड नफा कमावला आहे. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ प्रत्येक शेअर होल्डरला (SBI Share Holder) चांगला डिव्हिडेंट देणार आहे. (SBI Declare Dividend)

 

प्रत्येक शेअरवर मिळेल इतका डिव्हिडेंट

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर बँकेकडून 7.10 रुपये लाभांश मिळेल. यासाठी 26 मे 2022 ही शेअर रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) बँकेच्या स्वतंत्र नफ्यात 41.2% वाढ झाली आहे, म्हणजेच बँकेने रु.9113.53 कोटी नफा नोंदविला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बँकेचा नफा 6,450.75 कोटी रुपये होता. संपूर्ण आर्थिक वर्षात बँकेचा नफा 55.19% ने वाढून 31,676 कोटी रुपये झाला आहे. (SBI Declare Dividend)

 

व्याजामुळे वाढले बँकेचे उत्पन्न

स्टेट बँक ऑफ इंडियाची कमाई व्याजातही वाढ झाली आहे. कर्जावरील व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात 8.6% वाढ झाली आहे. तर व्याजातून निव्वळ उत्पन्न 15.26% वाढून 31,198 कोटी रुपये झाले आहे. तर गेल्या वर्षी याच काळात हे उत्पन्न 27,067 कोटी रुपये होते.

 

NPA प्रोव्हिजन केली कमी

या दरम्यान बँकेची NPA Provision ही कमी झाली आहे.
ती दोन तृतीयांश कमी होऊन 3,262 कोटींवर आली आहे.
तर गेल्या वर्षी ती 9,914 कोटी रुपये होती.
त्याच वेळी, बँकेचा Gross NPA तिच्या एकूण मालमत्तेच्या 3.97% इतका कमी झाला आहे,
जो मागील वर्षी याच कालावधीत 4.98% होता.

 

बँकेने माहिती दिली आहे की त्यांच्या रिटेल पोर्टफोलिओने आता 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
यामध्ये, गृह कर्जाचा (SBI Home Loan) हिस्सा 23% आहे आणि तो केवळ 11.49% वाढला आहे.

 

Web Title :- SBI Declare Dividend | sbi declare fy22 q4 result earned rs 9113 cr profit announce 710 dividend to share holders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा