SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हा’ फॉर्म न भरल्यास होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये आपले खाते असेल आणि जर आपण त्यात एफडी केले असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. कारण एफडीवर मिळणारा नफा आता कमी होऊ शकतो. यासाठी आपण फॉर्म १५ जी / एच सबमिट करणे आवश्यक आहे. तुमच्या एफडीच्या नफ्यावर बँक टीडीएस वजा करते. मात्र एफडी व बचत खात्यातून वार्षिक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज दिले जाते तेव्हाच ही वजावट केली जाते. एसबीआयने आता एक सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे ज्यामुळे आपण कर कपात टाळण्यासाठी घरबसल्या फॉर्म १५ जी / १५ एच सबमिट करू शकता. चला त्याबद्दल जाणून घेऊया …

काय आहे नियम :

सोप्या शब्दात सांगायचे तर याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या वित्तीय वर्षात मिळालेले व्याज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर बँका त्या व्याज रकमेवर टीडीएस वजा करतात. यापूर्वी ही मर्यादा मागील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०१८-१९ साठी १०,००० आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० रुपये होती. सध्याच्या आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ही मर्यादा ४०,००० रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० रुपये आहे.

तुम्हाला फॉर्म १५ जी / एच का भरावा लागेल :

जर तुमचे एकूण उत्पन्न आणि बँकेच्या व्याजातील उत्पन्न असे एकूण उत्पन्न इन्कम टॅक्सच्या मूलभूत सूटच्या मर्यादेत असेल तर तुम्ही फॉर्म १५ जी / एच सादर करून तसे जाहीर करणे आवश्यक आहे. याचाच अर्थ फॉर्म १५ जी / एच फॉर्म बँकेत जमा करून आपण हे सुनिश्चित करू शकता की बँकेने आपल्याला दिलेल्या व्याजावर कोणतेही कर देयता नाही आणि आपल्या परताव्यामधून कर वजा करू नये.

हे लक्षात घ्या :

सर्वप्रथम, आपण फॉर्म १५ जी / एच भरण्यास पात्र आहात की नाही हे तपासने गरजेचे आहे. याचा अर्थ असा आहे की आर्थिक वर्षात सर्व स्त्रोतांकडून मिळालेल्या आपल्या उत्पन्नावर कर भरला गेला असेल तर मात्र आपण बँकेत एफडीवरील व्याजावर सूट मिळवण्यास पात्र नाही आहात.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like