SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – SBI FD Interest Rates 2022 | कोरोनामुळे अस्ताव्यस्थ झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये आता सुधार होऊ लागलाय. याचबरोबर बँकांकडे मोठ्या प्रमाणात कर्जाची मागणी वाढू लागली आहे. कर्जाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी बँका वेग-वेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. यात मुदत ठेव (Fixed Deposit) च्या रूपाने पैसे गोळा करणे सुरु आहे. FD मार्फत पैसे गोळा करण्यासाठी नुकतेच भारतीय स्टेट बँक (SBI) आणि एचडीएफसी (HDFC) बँकेने व्याज दरांमध्ये 10 आधार गुण वाढवले. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा व्याज दर वाढवले आहे. (SBI FD Interest Rates 2022)

 

2 कोटी पेक्षा कमी ठेवीवर नफा मिळेल
बँकांनी दिलेल्या माहितीनुसार व्याज दरात वाढीचा लाभ 2 कोटी पेक्षा कमी असलेल्या ठेवीवर मिळेल. हा वाढलेला व्याजदर या महिन्यापासून लागू झालाय. तज्ज्ञांच्या मते पुढे अनेक बँका येणाऱ्या काळात एफडीच्या (FD) व्याजदरात वाढ करतील.

 

ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज
कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर मिळतो. बँक एफडीवर (FD) वरिष्ठांना 50 आधार अंक जास्त व्याज मिळवून देते. (SBI FD Interest Rates 2022)

 

आरबीआई (RBI) पण वाढू शकते व्याज दर
भारतीय रिजर्व बँकेने (RBI) बर्‍याच काळापासून व्याज दरात काही बदल नाही केले. या वेळेस आरबीआई (RBI) चे व्याज दर खूप कमी आहेत. तज्ज्ञाचं म्हणणं आहे कि सध्याच्या स्तिथीला पाहून आरबीआई येणाऱ्या काळात आपले व्याजदर वाढवू शकतं.

एफडीवर सर्वात जास्त व्याज देणारी बँक

एसबीआई कालावधी दर (% मध्ये)

6 महिने ते 1 वर्ष 4.4

1 ते 2 वर्षे 5.1

2 ते 3 वर्षे 5.1

3 ते 5 वर्षे 5.3

5 ते 10 वर्षे 5.4

 

कोटक महिंद्रा बँक कालावधी दर (% मध्ये)

6 महिने ते 1 वर्ष 4.4

1 ते 2 वर्षे 4.9-5.1

2 ते 3 वर्षे 5.15

3 ते 5 वर्षे 5.3

5 ते 10 वर्षे 5.3

 

एचडीएफसी बैंक कालावधी दर (% मध्ये)

6 महिने ते 1 वर्ष 4.4

1 ते 2 वर्षे 5

2 ते 3 वर्षे 5.2

3 ते 5 वर्षे 5.4

5 ते 10 वर्षे 5.6

 

Web Title :- SBI FD Interest Rates 2022 | news of your benifits now more interest on fd in 3 banks including sbi HDFC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव

 

SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर

 

Demu Train Derailed Pune | पुणे रेल्वे स्थानकाजवळ डेमू रेल्वे रुळावरुन घसरली (व्हिडीओ)