SBI FD Rates | खुशखबर ! SBI ने कोट्यवधी ग्राहकांना दिली भेट, वाढवला FD चा व्याजदर, चेक करा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI FD Rates | HDFC बँकेनंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मुदत ठेवीच्या (FD) व्याजदरात (SBI FD Rates) वाढ करण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, एसबीआयने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर दर बदलले आहेत. FD वर बँकेचे वाढलेले दर 15 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आले आहेत.

 

वेबसाइटनुसार, बँकेने निवडक कालावधीसाठी 10 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयने एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने या कालावधीसाठी एफडीवरील व्याजदर 5 टक्क्यांवरून 5.1 टक्के केला आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.60 टक्के करण्यात आला आहे. SBI 5-10 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक 5.40 टक्के व्याजदर देते. या कालावधीसाठी बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के दराने व्याज देत आहे. (SBI FD Rates)

नवीन एफडी दर –

कालावधी व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज

7-45 दिवस 2.90% 3.40%

46-179 दिवस 3.90% 4.40%

180-210 दिवस 4.40% 4.90%

211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 4.40% 4.90%

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी 5.00% 5.60%

2 वर्षे 1 दिवस – 3 वर्षे 5.10% 5.60%

3 वर्षे 1 दिवस – 5 वर्षे 5.30% 5.80%

5 वर्षे 1 दिवस – 10 वर्षे 5.40% 6.20%

स्रोत – SBI वेबसाइट

 

HDFC बँकेचे नवीन FD दर जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने ठराविक कालावधीसाठी मुदत ठेवींवर (FD) व्याजदर वाढवले आहेत. HDFC बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर दर बदलले आहेत. एफडीवर बँकेचे वाढलेले दर 12 जानेवारी 2022 पासून लागू आहेत.

बँकेच्या वेबसाइटनुसार, आता 2 वर्ष 1 दिवस आणि 3 वर्षांच्या एफडी वर 5.2% व्याज मिळेल. 3 वर्ष 1 दिवस आणि 5 वर्षाच्या एफडीवर 5.4% आणि 5 वर्ष 1 दिवस आणि 10 वर्षाच्या एफडीवर 5.6%.

 

बँकेच्या वेबसाइटनुसार, एचडीएफसी बँक 7 ते 29 दिवसांत मुदतपूर्ती होणार्‍या ठेवींवर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3 टक्के व्याज देईल. 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज देईल.

 

6 महिने ते 1 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीसाठी 4.4 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे, बँक एका वर्षाच्या एफडीवर 4.9 टक्के ऑफर देत आहे. तर, ICICI बँकेचा एफडी दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.5-5.5% दरम्यान आहेत.

 

Web Title :- SBI FD Rates | sbi fd rates changes from today 15 jan check state bank of india new fd interest rates here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा