SBI ची दिवाळी ऑफर ! ‘या’ अ‍ॅपव्दारे कार खरेदी केल्यावर मिळणार 5 लाखापर्यंत कॅशबॅक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने एक नवीन ऑफर लाँच केली असून याअंतर्गत तुम्हाला कार खरेदी केल्यास पाच लाख रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे हि योजना
या योजनेविषयी बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये तुम्ही योनो अ‍ॅपच्या मदतीने Ford EcoSport हा गाडी बुक केल्यास तुम्हाला किमतीच्या जवळपास 50 टक्के कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. मात्र हि रक्कम केवळ 5 लाखांपर्यंतच असणार आहे. 31 नोव्हेंबर 2019 पर्यंत ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात.

अशा प्रकारे करा गाडीची बुकिंग
सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये SBI चे Yono अ‍ॅप इंस्टॉल करा. त्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर दिलेली पूर्ण पद्धत फॉलो करून त्यावर लॉगइन करा. तुम्ही केवळ या अ‍ॅपवरून गाडी बुक केल्यासच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे.

काय खास आहे ऑफरमध्ये
या ऑफरमध्ये तुम्हाला कार लोनवरील प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला 8,536 रुपये किमतीच्या ऍक्सेसरीज देखील मिळणार आहे.

visit : Policenama.com