SBI Festive Offers : उत्सवाच्या हंगामात एसबीआयची मोठी ऑफर ! Home Loan व्याज दरावर 0.25% ची सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीचा हंगाम पाहता देशातील अनेक बड्या बँका आपल्या ग्राहकांकडून आकर्षक ऑफर देत आहेत. या मालिकेत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) घर खरेदीदारांसाठी अतिशय आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज दरामध्ये 0.25 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. या घोषणेनुसार एसबीआयच्या होम लोन ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदीसाठी 0.25% व्याज सूट मिळेल.

एसबीआयने नुकत्याच केलेल्या सणाच्या ऑफरच्या घोषणेनुसार बँक देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृह कर्जावरील पतसंख्येच्या आधारे 0.20 टक्क्यांपर्यंत सवलत देईल. देशातील आठ महानगरांमध्ये तीन कोटी रुपयांपर्यंतच्या गृह कर्ज ग्राहकांनाही ही सूट मिळणार आहे. त्याचबरोबर योनो अँपद्वारे अर्ज करून सर्व गृह कर्जात अतिरिक्त 0.5 टक्के सूट देखील मिळू शकेल.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की ते 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जात खूपच कमी व्याज दर देत आहे. येथे व्याज दर 6.90 टक्के पासून सुरू होते. त्याचबरोबर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 7 टक्के असेल.

महत्त्वाचे म्हणजे एसबीआयने यापूर्वीच कार लोन, गोल्ड लोन आणि पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये 100 टक्के सवलत जाहीर केली आहे. बँकेच्या किरकोळ ग्राहकांना सुरुवातीच्या 7.5 टक्के व्याज दराने कारचे कर्ज मिळत आहे. त्याचबरोबर या उत्सवाच्या हंगामात बँकेने सोन्याचे कर्ज आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांना अनुक्रमे 7.5 टक्के आणि 9.6 टक्के व्याज दर दिले आहेत. एसबीआय ग्राहकांना कागदीविरहित पद्धतीने योनो अँपद्वारे काही क्लिकवर पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज आणि इंस्टा होम टॉप-अप कर्ज घेण्याची सुविधा आहे.