सणासुदीत SBI नं दिलं ग्राहकांना गिफ्ट ! डेबिट कार्डवरून हप्त्याने खरेदी करा वस्तू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सणासुदीच्या दरम्यान आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. या सणादरम्यान आपल्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करावी या उद्देशाने बँकेने आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड ईएमआयची सुविधा लॉन्च केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहक किमान 6 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत ईएमआय कालावधीचा पर्याय निवडू शकतात.

1500 पेक्षा अधिक शहरात मिळणार सेवा –
ग्राहक 1500 पेक्षा जास्त शहरात 40,000 पेक्षा जास्त व्यापारी आणि दुकानांच्या माध्यमातून आपल्या आवडीचे प्रोडक्ट्स खरेदी करु शकतात, ज्यांच्याकडे पीओएस मशीन लावण्यात आली आहे. या मशीनची संख्या एकूण 4.5 लाखापेक्षा अधिक आहे.

SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले की, ग्राहकांसाठी हे प्रोडक्ट्स लॉन्च केल्याचा आनंद आहे जेणेकरुन त्यांना सणासुदीच्या दरम्यान सुखद खरेदीचा अनुभव घेऊ शकतील. डेबिट कार्ड ईएमआय सुविधामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करणे आधिक सोपे होईल. सध्या संपूर्ण रक्कम न देता ते विविध व्यापारी आणि दुकानदारांकडून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करु शकतात.

मिळणार हे फायदे –
या सेेवेचा वापर करताना ग्राहकांना जे काही प्रमुख लाभ मिळतात, ते आहेत झीरो डॉक्यूमेंटेशन, कोणतीही प्रोसेसिंग फी नाही, ब्रांच विजिटची गरज नाही, इंस्टेंट डिस्बर्सल आणि काही निवडक ब्रांडवर शून्य ईएमआयची सुविधा. या सुविधेचा लाभ सध्याच्या बचत खात्याचा वापर न करता एक मिनिटापेक्षा कमी वेळेत घेता येईल. व्यवहार पूर्ण होण्याच्या एक महिन्यानंतर ईएमआयची सुरुवात होईल.

अशी होईल पात्रतेची तपासणी –
क्रेडिट हिस्ट्री असलेले सर्व ग्राहक लोन प्राप्त करण्यासाठी पात्र आहे. अशा ग्राहकांना बँकेकडून एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून नियमित संदेश पाठवण्यात येईल. पात्रतेची तपासणी करण्यासाठी, ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन 567676 वर DCEMI लिहून एक एसएमएस देखील पाठवू शकतात.

Visit : Policenama.com