देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI सुरू झाली होती ६४ वर्षापुर्वी, जाणून घ्या माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशातील सगळ्यात मोठा बँक म्हणून बँक ऑफ इंडियाची ओळख आहे अशा या बँकेचा आज स्थापन दिवस आहे. १ जुलै १९५५ रोजी इम्पीरियल बँकेचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवण्यात आले. त्या दिवसा पासून १ जुलै ला एसबीआयई च्या देश विदेश शाखांमध्ये बँकचा स्थापना दिवस साजरा केला जातो.

जाणून घेऊया २१३ वर्ष जुन्या SBI सोबत जोडलेली काही माहिती १८०६ मध्ये, कोलकाता येथे बँक ऑफ कोलकत्ता स्थापन झाले. नंतर बँक ऑफ बंगाल म्हणून ओळखले गेले.

बँक ऑफ मुंबई आणि बँक ऑफ मद्रास १९२१ मध्ये बँक ऑफ बंगालमध्ये विलीन झाले. जे मिळून इम्पीरियल बैंक ऑफ इंडिया बनला.

इम्पीरियल बँकेचा मुख्य हेतू युरोपियन व्यापारांना पाठिंबा देणे होता. या बँकेचे स्टॉकहोल्डर विशेषतः युरोपियन लोक होते.

सन १८६० मध्ये बँकिंग ऑपरेशन्समध्ये मोठा बदल झाला. १८६१ मध्ये पेपर करन्सी कायदा पास झाला. सरकारने चलन नोट्स जारी करण्याचे अधिकार दिले.

स्वातंत्र्यानंतर, भारतीय रिझर्व बँकेने १९५५ मध्ये इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचा अधिग्रहण केला. हा अधिग्रहण भारत अधिनियम (१९५५) अंतर्गत करण्यात आला. यानंतर बँकेचे नाव स्टेट बँक असे ठेवण्यात आले.

आरोग्यविषयक बातम्या

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

‘उभे राहून पाणी पिणे’ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक