खुशखबर ! 10 नोव्हेंबरपासुन ‘स्वस्त’ होणार SBI चं ‘होम’-‘ऑटो’ आणि ‘पर्सनल’ लोन, 8 महिन्यात सातव्यांदा व्याजदरात ‘कपात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने आपल्या मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे. यावर्षी सातव्यांदा या दरांमध्ये कपात केली असून 10 नोव्हेंबर 2019 पासून नवीन दर लागू होणार आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून होम लोन,ऑटो लोन आणि पर्सनल लोन असणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे व्याजदरामध्ये कपात होणार असून कर्जाचा हफ्ता देखील कमी होणार आहे.

किती स्वस्त होणार हफ्ता
ज्या ग्राहकांनी मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटच्या हिशोबाने कर्ज घेतले आहे त्यांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. त्यांच्या कर्जाच्या हफ्त्यामध्ये 0.05 घट होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आरबीआयने व्याज दरांमध्ये कपात केल्याने अनेक बँकांनी आपल्या व्याज दरांमध्ये कपात केली आहे. याआधी एचडीएफसीने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये 0.05 ते 0.10 टक्क्यांची कपात केली होती.

Visit : Policenama.com