SBI ची खास सुविधा ! विना ‘कार्ड’, ‘कॅश’ शिवाय आता फक्त ‘मोबाइल’ दाखवून करा ‘शॉपिंग’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा शॉपिंग करायला गेलेले असताना कॅश किंवा कार्ड घरी विसरले जाते अशात तुम्हाला खरेदी करणे अवघड होते. आता यावर उपाय म्हणून एसबीआयने नवीन सेवा सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही कॅश आणि कार्ड नसतानाही शॉपिंग करू शकणार आहात. यासाठी तुम्ही आता मोबाईल वरून थेट पे करू शकणार आहात.

जाणून घेऊयात या नवीन सर्विस बाबत
कसा करू शकतील वापर – एसबीआय कार्ड पे वापरण्यासाठी कार्डधारकांना एसबीआय कार्ड मोबाइल अ‍ॅपवर एकदा कार्ड रजिस्टर करावे लागेल. यानंतर ग्राहकांना पेमेंट करणे सहज शक्य होणार आहे. फोनला अनलॉक करून मोबाइलला प्वाइंट ऑफ सेल टर्मिनल (POS) जवळ घेऊन जाताच तुमचे पेमेंट होईल.

SBI कार्डने या सुविधेला VISA प्लेटफॉर्मवर लॉंच केले आहे. कोणत्याही अँड्रॉइड स्मार्ट फोनवर याचा वापर केला जाऊ शकतो. किटकॅट नंतरच्या कोणत्याही OS नंतरच्या फोनमध्ये हे सुरु करता येणार आहे.

2 हजार रुपयांपर्यंत करू शकता पेमेंट
SBI ने कार्ड पे ग्राहकांना इच्छा नुसार ट्रॅन्जेक्शन करण्याची सूट दिली आहे. शिवाय यामध्ये रोज लिमिट सेट करण्याची मुभा दिली आहे.सध्या इतर एचसीई अ‍ॅप्स ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी 2000 रुपयांपर्यंत आणि दिवसाला 10,000 रुपयांपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी देतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/