Debit Card व्दारे नाही होणार ‘फसवणूक’, जर तुम्ही अवलंबले हे 10 ATM सुरक्षा ‘मंत्र’, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना काही खास टिप्स दिल्या आहेत, जेणेकरून त्यांची डेबिट कार्ड वापरताना फसवणूक होऊ नये. एसबीआयने आवाहन केले आहे की, ग्राहकांनी कोणत्याही एटीएम-कम-डेबिट कार्ड फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी पूर्ण प्रायव्हसीमध्ये एटीएम व्यवहार केले पाहिजेत. एसबीआयने ट्विट केले की, तुमचे एटीएम कार्ड आणि पिन महत्वपूर्ण आहे. येथे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत.

1 एटीएम किंवा पीओएस मशीनवर एटीएम कार्डचा वापर करताना कीपॅडला कव्हर करण्यासाठी आपल्या हाताचा वापर करा.

2 कधीही आपल्या पिन / कार्ड डिटेल्स शेयर करू नका.

3 आपल्या कार्डवर पिन कधी लिहू नका.

4 कार्डच्या डिटेल्स किंवा पिनसाठी ईमेल किंवा कॉलला उत्तर देऊ नका.

5 तुमची जन्म तारीख, फोन किंवा अकाऊंट नंबरवरून आपला पिन नंबर तयार करू नका.

6 ट्रांजक्शनची रिसीट डिस्पोज करू नका.

7 ट्रांजक्शन सुरू करण्यापूर्वी हेरगिरी करणारे कॅमेरे आहे का ते शोधा.

8 कीपॅड हेराफेरीपासून सावधान राहा, एटीएम किंवा पीओएस मशीनचा वापर करताना हीट मॅपिंग करा.

9 आपल्या मागे आपला पिन चोरणार्‍या कोणत्याही व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.

10 व्यवहरांच्या अलर्टसाठी साईन अप करणे लक्षात ठेवा.

रात्री करा ओटीपी आधारित कॅश विड्रॉल सिस्टमचा वापर
बँकांनी नुकतकेच रात्री 8 वाजेपासून सकाळी वाजेपर्यंत एटीएमवर कॅश विड्रॉल करतेवेळी ओटीपी आधारित सिस्टम सुरू केली आहे. ही 1 जानेवारी 2020 पासून लागू केली आहे.