खुशखबर ! घरी असलेल्या सोन्याच्या दागिन्यांव्दारे करा ‘कमाई’, SBI च्या ‘या’ खास ‘स्कीम’मधून मिळणार ‘जास्तीच’ व्याज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने किंवा सोन्याची नाणी असतील तर आता तुम्ही या सोन्याच्या मदतीने पैसे कमवू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया हि तुम्हाला सुविधा देत असून गोल्‍ड डिपॉजिट स्‍कीम या योजनेद्वारे तुम्हाला व्याजासह फायदे देखील मिळणार आहेत. तुमच्या सोन्याच्या प्रतीवर तुम्हाला बँक जमा केलेल्या सोन्याचे प्रमाणपत्र देते. त्यानंतर तुम्ही गुंतवणूक केलेला कालावधी संपला कि, बँक तुम्हाला सोने किंवा रोखीच्या रूपात त्याचे व्याज देणार आहे. त्यामुळे लवकरत लवकर या सुविधेचा फायदा घेऊ शकता. यामुळे तुमचे सोनेदेखील सुरक्षित राहील आणि पैसे देखील कमावण्याची संधी मिळणार आहे.

कोण करू शकतो गुंतवणूक
एसबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. सिंगल, जॉईंट अकाउंट काढून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर या योजनेत कमीत कमी ३० ग्राम सोन्याची गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र जास्तीत जास्त कितीही सोन्याची तुम्ही गुंतवणूक करू शकता.

मध्येच माघार घेतल्यास दंड
या योजनेत एका वर्षाच्या आत तुम्ही तुमचे सोने काढण्याची मागणी केल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. मीडियम टर्म या योजनेत तुम्ही कमीत कमी ३ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. तर लॉंग टाईम योजनेत तुम्ही कमीत कमी ५ वर्षासाठी गुंतवणूक करू शकता.

या ठिकाणी मिळणार योजनेचा फायदा
एसबीआयच्या दिल्लीतील पीबीबी शाखेत, चांदणी चौकातील शाखेत, कोईम्बतूर शाखेत, हैदराबाद मधील मुख्य शाखेत तसेच मुंबईमधील बुलियन शाखेत तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

इतके मिळणार व्याज
या योजनेत एका वर्षासाठी ०. ५० टक्के व्याज मिळणार असून दाेन वर्षासाठी ०. ५५ टक्के तर तीन वर्षांसाठी ०. ६० टक्के व्याजदर मिळणार आहे.

मिळू शकते कर्ज
या योजनेत सोने गुंतवल्यास तुम्हाला या सोन्याच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज देखील मिळू शकते.

आयकरात सूट
या योजनेत पैसे गुंतवल्यास यातून मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागणार नाही. त्यामुळे तुमचा सर्व बाजुंनी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

लाॅकरची रक्कम वाचते
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सोने ठेवण्यासाठी बँकेला लॉकरसाठी जी फी द्यावी लागते ती यामुळे द्यावी लागणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like