SBI Alert ! बदलले ‘कॅश’ काढण्याचे नियम, आता एका दिवसात काढू शकता ‘इतके’ रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) (SBI) ने अलिकडेच आपल्या ग्राहकांसाठी नवीन नोटिफिकेशन जारी केले आहे, ज्यामध्ये रोख रक्कम करण्याचे नवीन नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार, आता नॉन-होम ब्रँचमधून रोकड काढण्याची मर्यादा वाढवली आहे, ग्राहक एका दिवसात 25000 रुपये काढू शकतात.

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा आता घरच्या घरी, जाणून घ्या

1 दिवसात काढता येतील 25000
एसबीआयने SBI आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी ट्विट करत सांगितले की, कोरोना महामारीमध्ये आपल्या ग्राहकांचे समर्थन करण्यासाठी एसबीआयने चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मच्या माध्यमातून नॉन-होम ब्रँचमधून रोकड काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता ग्राहक आपल्या जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन एका दिवसात आपल्या बचत खात्यातून 25,000 रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात.

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

चेकद्वारे काढू शकता 1 लाख रुपये
मात्र, चेकद्वारे कॅश काढण्याचे लिमिट 1 लाख रुपयांपर्यंत असेल. तर थर्ड पार्टी म्हणजे ज्यास चेक जारी केला आहे, त्यांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI नोटिफिकेशननुसार, नवीन नियम ताबडतोब प्रभावी केले आहेत. हे नियम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू राहतील. म्हणजे या महामारीत आता बँकेतून कॅश काढण्यासाठी सतत फेर्‍या माराव्या लागणार नाहीत.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या