Coronavirus Lockdown : बँकेत गरजेचे काम असेल तर Bank उघडण्याचा आणि बंद होण्याची वेळ तपासा, SBI-HDFC सह सर्वांनी बदलला Time

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे भारतीय स्टेट बँकेसह अनेक बँकांनी शाखांमध्ये कामाचे तास वेगवेगळे केले आहेत. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी के गुप्ता म्हणाले की, आम्ही देशभरात राज्य सरकार आणि जिल्हा/ प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर बॅंकेच्या कामकाजाचे वेगवेगळे तास ठरवले आहेत.

ते म्हणाले की, अनेक राज्यात आम्ही शाखा उघडण्याची वेळ सकाळी ७ वाजता ते १० पर्यंत आणि काही राज्यात सकाळी ८ ते ११ पर्यंत केली आहे. काही ठिकाणी १० ते २ अशीही वेळ आहे. खाजगी क्षेत्रातील स्टॅंडर्ड चार्टर्डने म्हटले की, २३ मार्चपासून त्यांच्या शाखा सकाळी १० ते २ पर्यंत काम करणार आहेत. पुढच्या आदेशापार्यंत हीच व्यवस्था असेल.

बँकेनेही कामासाठी वेगवेगळे तास ठरवले आहेत. इंदूरमध्ये ११ ते २, डेहराडूनमध्ये सकाळी ७ ते १०, साहरनपुरमध्ये ८ ते ११, लुधियाना आणि जालंदरमध्ये ११ ते २ पर्यंत वेळ आहे. एचडीएफसी बँक आणि येस बँकेनेही कामाच्या वेळा बदलून १० ते २ वाजेपर्यंत केली आहे. ही व्यवस्था सध्या २३ ते ३१ मार्चपर्यंत असून बँकेने ग्राहकांना बँकेसंबंधी गरजेसाठी डिजिटल आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्यास सांगितले आहे.

HDFC, ICICI आणि Axis बँकेनेही आपल्या कामाच्या वेळेत केले बदल
या अगोदर कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाला पाहता HDFC आणि ICICI बँकेनेही आपल्या कामाच्या वेळात बदल केला असून त्यांनी ग्राहकांना व्यवहारासाठी डिजिटल बँकिंगचा वापर करण्यास सांगितले आहे. एचडीएफसी बँक आता ३१ मार्चपर्यंत रविवार सोडून सकाळी १० ते २ पर्यंत खुली राहणार आहे. आयसीआयसीआय बँकेने एसएमएस करून आपल्या ग्राहकांना सांगितले की, त्यांच्या शाखा कमी कर्मचारी व स्वच्छतेसाठी आवश्यक त्या गोष्टींसह शाखा खुल्या राहतील. Axis बँकेनेही २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार आणि ऑनलाईन IMPS ला विनाशुल्क ठेवण्याची घोषणा केली असून ही सुविधा बचत, चालू आणि प्रीपेड ग्राहकांसाठी असेल.