SBI Hike Interest Rate On Home Loan | कर्जदारांना मोठा झटका ! SBI कडून आठवडाभरात दुसऱ्यांदा व्याजदरात वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI Hike Interest Rate On Home Loan | भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. SBI ने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ (SBI Hike Interest Rate On Home Loan) केली आहे. सोमवारी गृहकर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा दर (EBLR) 7.5 टक्के झाला आहे. रेपो दराशी सलग्न कर्जदर (RLLR) 6.65 टक्के एवढा वाढला आहे. 1 जून 2022 रोजी पासून नवे व्याजदर लागू होणार असल्याचं एसबीआयकडून (SBI) सांगण्यात आलं आहे.

 

आज एसबीआयने कर्जदारांना मोठा झटका दिला. सोमवारी एसबीआयकडून गृहकर्ज दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आलीय. मागील आठवड्यामध्ये काही बँकांनी कर्जदरात वाढ केली होती. खरंतर दोन आठवड्यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) महागाई रोखण्यासाठी रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्यात आली होती. तेव्हा आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे बँकांकडून हा भार ग्राहकांवर लादला जाण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, एसबीआयच्या वेबसाईटनुसार बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा दर (EBLR) 7.5 टक्के झाला. रेपो दराशी सलग्न कर्जदर (RLLR) 6.65 टक्के इतका वाढला आहे. याआधी बाह्यघटकांवर आधारित कर्जाचा व्याजदर (EBLR) 6.65 टक्के आणि रेपो दराशी सलग्न कर्जदर (RLLR) 6.25 टक्के इतका होता. गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्ज (Auto Loan) देताना बँकेकडून ईबीएलआर आणि आरएलएलआर या दोन्ही कर्जदरात क्रेडिट रिस्क प्रीमियम (CRP) जोडला जातोय.

दरम्यान, मागील आठवड्यामध्ये स्टेट बँकेने कर्जाचा दर (MCLR) 0.10 टक्क्याने वाढवला होता.
15 मे 2022 पासून नवीन कर्जदर लागू झाला होता. या दरवाढीनंतर बँकेचा MCLR दर 6.85 टक्के इतका झालाय.
1 वर्षासाठी तो 7.20 टक्के, 2 वर्षासाठी 7.40 टक्के आणि 3 वर्ष कालावधीसाठी MCLR दर 7.50 टक्के इतका वाढला आहे.
या व्याजदर वाढीनंतर नवे कर्ज महागणार आहे. त्याचबरोबर कर्जाचा हप्ताही वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- sbi hike interest rate on home loan know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न; 4 महिलांसह 8 जणांवर FIR

 

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

 

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार