SBI Hikes MCLR | SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी ! कर्जाचा EMI आणखी वाढणार; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI Hikes MCLR | देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) म्हणजेच SBI कडे पाहिले जाते. एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट अर्थात MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) वाढवले आहे. याबाबत नवीन नियम 15 मे अर्थात रविवारपासून लागू झाले आहेत. या निर्णयाने बँकेकडून प्रत्येक कार्यकाळासाठी 10 बेसिस पॉइंट्स (0.10) टक्के वाढ (SBI Hikes MCLR) करण्यात आली आहे.

 

दरम्यान, एसबीआयचा 1 महिना आणि 3 महिन्यांचा MCLR आता 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के झालाय. सहा महिन्यांसाठी MCLR 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, 2 वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के इतका झाला आहे. (SBI Hikes MCLR)

 

आरबीआयने रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने 40 बेसिस पॉइंटने वाढ केली.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की आरबीआय व्याजदर आणखी वाढवू शकते, ज्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे अधिक महाग होईल.
SBI द्वारे वितरित केलेल्या कर्जांपैकी सर्वात मोठा हिस्सा (53.1 टक्के) MCLR संबंधित कर्जांचा आहे.
त्याचबरोबर, ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या (SBI Loan) मासिक EMI मध्ये वाढ होणार आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा (Dinesh Khara) यांच्या माहितीनुसार, नुकतंच बँकेनं दोन कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याजदरामध्ये 40 – 90 बेसिक पॉइंट्सने वाढ केली होती.
या वाढीमुळे बँकेच्या मार्जिनवर सकारात्मक परिणाम होईल. कारण बहुतांश कर्जे सतत बदलणाऱ्या दरांवर आधारित असतात.
याचा अर्थ रेपो दरात बदल होताच हेही बदलले जातील.

 

काय आहे MCLR ?
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट अर्थात MCLR कर्ज दर हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा अंतर्गत बेंचमार्क अथवा संदर्भ दर असतो.
हे कोणत्याही कर्जाचे कमीतकमी व्याज दर निश्चित करत असते.
2016 साली RBI ने MCLR चा भारतीय वित्तीय व्यवस्थेत समावेश केला होता.
याआधी 2010 साली लागू करण्यात आलेल्या बेस रेट प्रणालीअंतर्गत व्याज निश्चित केले होते.
MCLR लागू झाल्यानंतर ते बंद केले आहे.

 

Web Title :- SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा