SBI नं व्याज दर कमी केल्यानंतर एवढा कमी होणार तुमचा EMI, जाणून घ्या संपूर्ण ‘गणित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – SBI ने आपल्या निधी आधारित कर्ज देण्याच्या दरात (MLCR) मध्ये ०.०५ टक्क्यांने कपात केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयानंतर १ वर्षापर्यंत कालावधी असलेल्या व्याज दरात ०.०५ टक्क्यांने कमी करुन ८.४० टक्के करण्यात आले आहे. SBI ने घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही घर खरेदी करुन इच्छितात तर तुम्हाला SBI कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. SBI ने आपल्या गृह कर्जात कपात केली असून बुधवार पासून ही कपात लागू करण्यात येईल. त्यामुळे ग्राहक आता कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात.

SBI ने आपल्या ग्राहकांना माहिती दिली होती की यापुढे १ जुलै पासून रेपो रेटशी संबंधित गृहकर्जाची घोषणा केली जाईल. म्हणजेच आरबीआय यापुढे रेपो रेटमध्ये बदल केल्यास SBI गृह कर्जावरील व्याज दरात कपात करेल किंवा त्यात वाढ करेल. याचा फायदा गृह कर्ज घेणाऱ्याबरोबरच वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांना देखील होणार आहे.

व्याज दरात कपाती आधीचा हिशोब –
गृह कर्ज – २५ लाख रुपये
कर्ज फेडण्याचा कालावधी – १८० महिने
कर्जावर व्याज – ८.६० टक्के
मासिक EMI – २४७६५.२५रुपये

व्याज दरात कपातीनंतरचा हिशोब –
गृह कर्जाची रक्कम – २५ लाख रुपये
कर्ज फेडण्याचा कालावधी – १८० महिने
कर्जावरील व्याज – ८.५५ टक्के
मासिक EMI – २४६९१.८२ रुपये

हिशोब – २४७६५.२५ – २४६९१.८२ रुपये = ७३.४३ रुपये

म्हणजे EMI वर एकूण ७३.४३ रुपयांची बचत होईल. परंतू रक्कम आणि कालावधीनुसार EMI कमी अधिक होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा