SBI Home Loan For Woman | महिलांसाठी स्वत:च्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; SBI ने आणली खास ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI Home Loan For Woman | भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (State Bank of India) बघितले जाते. SBI आता आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कमी व्याज दरात गृहकर्ज (SBI Home Loan For Woman) देत आहे. तसेच जर कर्ज घेणारी महिला (Women) असेल तर ती इतर फायद्यांशिवाय सवलतींचा लाभ देखील घेऊ शकते. असं SBI कडून सांगण्यात आलं आहे. म्हणजेच आता महिलेला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध असणार आहे.

 

बँकेने आपल्या अधिकृत हँडलवर केलेल्या ट्विटमधून सांगितलं आहे की, SBI होम लोन सह तुमचे स्वप्नातील घर मिळवा. 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक लोन घेऊ शकतात. SBI च्या नियमित होम लोन मध्ये Flexipay, NRI होम लोन, गैर – पगारदारांना लोन, डिफ्रेन्शियल ऑफरिंग, विशेषाधिकार, शौर्य आणि अपना घर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) जितका चांगला असेल तितकी कर्जाची रक्कम अधिक असणार आहे. (SBI Home Loan For Woman)

 

गृहकर्ज मिळवण्यासाठी अटी –

लोनसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताची रहिवासी असावी.

वय किमान 18 वर्षे आणि अधिकाधिक 70 वर्षे असावे.

कर्जाचा कालावधी 30 वर्षे असेल.

 

स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) नवीन व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया वार्षिक 6.65 टक्के दराने होम लोन देत आहे. तुम्ही घेणार त्या रकमेवर तुम्हाला 6.65 टक्के वार्षिक व्याज द्यावं लागेल.

 

दरम्यान, जर महिलांना घर खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी आणखी सवलती आहेत.
सर्वसामान्य होम लोनपेक्षा घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी होम लोनचा व्याजदर कमी असणार आहे.
तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर SBI खूप चांगल्या सवलती देत आहे.
तसेच महिला खरेदीदारांसाठी तर लोनचा व्याजदर सर्वसामान्य दरांपेक्षा कमी असणार आहे.

 

Web Title :- SBI Home Loan For Woman | sbi special offer for women the dream of owning a home will come true

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा