खुशखबर ! SBI कडून ‘गृह कर्जात कपात, घर घेणाऱ्यासाठी ‘सुवर्णसंधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९-२० साठीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सामन्याना करातून मुक्ती मिळेल यासाठी अनेक योजना आणल्यात. मात्र त्याआधी आरबीआयने रेपो रेट कमी केला होता. त्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने देखील आपल्या व्याज दरात कपात केली, त्यानंतर आता SBI ने आपल्या ग्राहकांना एक गृह कर्ज आणले आहे आणि त्यातून आता ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज मिळणार आहे.

SBI ने घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही घर खरेदी करुन इच्छितात तर तुम्हाला SBI कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. SBI ने आपल्या गृह कर्जात कपात केली असून मंगळवारी ही कपात करण्यात आली. त्यामुळे ग्राहक आता कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात.

SBI ने माहिती दिली आहे, की मंगळवारी गृह कर्जाच्या व्याजदारात कपात करण्यात आली आहे आणि हे नवे व्याज दर बुधवार पासून म्हणजे आज पासून लागू होतील. त्यामुळे आता कमी व्याजदरात ग्राहकांना आली घराचे स्वप्नपुर्ण करता येणार आहे.

हे आहे नवे व्याज दर
SBI ने आपल्या निधी आधारित कर्ज देण्याच्या दरात (MLCR) मध्ये ०.०५ टक्क्यांने कपात केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयानंतर १ वर्षापर्यंत कालावधी असलेल्या अवधीवर व्याज दरात ०.०५ टक्क्यांने कमी करुन ८.४० टक्के करण्यात आले आहे.

SBI ने आपल्या ग्राहकांना माहिती दिली होती की यापुढे १ जुलै पासून रेपो रेटशी संबंधित गृहकर्जाची घोषणा केली होती. म्हणजेच आरबीआय यापुढे रेपो रेटमध्ये बदल केल्यास SBI गृह कर्जावरील व्याज दरात कपात करेल किंवा त्यात वाढ करेल.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात