SBIच्या 2 दिवसाच्या ‘विशेष’ उत्सवात होम लोनवर ‘बंपर’ ऑफर, जाणून घ्या ऑफर विषयी

मुंबई : वृत्तसंस्था – स्वतःच्या मालकीचे घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आर्थिक कारणांमुळे सर्वांनाच स्वतःच घर घेता येत नाही. अशावेळी घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोनची मदत घेतली जाते. तुम्ही ही घर घेण्यासाठी होम लोन चा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. ही संधी देशातील सर्वात मोठी बँक ‘स्‍टेट बैंक ऑफ इंडिया’ तर्फे देण्यात येणार आहे.

२९ जून आणि ३० जूनला SBI दोन दिवसाचा ”होम लोन उत्‍सव” साजरा करणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून SBI कडून होम लोनवर अनेक आकर्षक ऑफर देण्यात येणार आहेत. SBI च्या सोशलमीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, बँक SBI च्या ग्राहकांना कोणतेही शुल्क न आकारता होम लोन उपलब्ध करून देणार आहे.

याशिवाय नवीन ग्राहकांसाठी होम लोन च्या व्याजदरात वेगवेगळ्या कॅटेगरीत सवलत देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर, काही अटी लागू करून लो ईएमआय चे ऑफर देखील देण्यात येणार आहे.

SBI च्या या उत्सवाविषयी अधिक माहितीसाठी बँकेकडून देण्यात आलेल्या मोबाईल नंबर ९४४८९९३२८५ / ९४४८९९४५६८ यांवर संपर्क करू शकतात. याशिवाय [email protected] या ई-मेल आयडीच्या माध्यमातून देखील माहिती घेता येऊ शकते.

नुकतेच SBI ने १ जुलैला रेपो रेटशी संबंधित होम लोन ऑफर करण्याची घोषणा केली. याचा अर्थ असा झाला की, पुढील महिन्यापासून SBI च्या होम लोन चे व्याजदर पूर्णपणे रेपो रेटवर अवलंबून असतील.

सिने जगत – 

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल

#Video : करिना कपूरचा ‘हा’ भन्‍नाट ‘फिटनेस’ व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

‘या’ ऍपच्या इव्हेंट मध्ये ‘कडक’ अंदाजात दिसून आली ‘ही’ अभिनेत्री..

You might also like