SBI नं दिलं ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट ! 1 जानेवारीपासुन गृह कर्जावर 7.90 % व्याज दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन वर्षाची ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये 0.25 टक्के म्हणजे 25 पॉईंटची कपात केली आहे. या कपातीनंतर एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड रेट 8.05 टक्क्यांवरून घटून 7.80 टक्के वार्षिक झाला आहे. हे नवीन दर 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहेत. एसबीआयने एमएसई, हाऊसिंग आणि रिटेल लोनचे सर्व फ्लोटिंग रेट लोन एक्सटर्नल बेंचमार्क रेपो रेटबरोबर जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे आहेत 4 बेंचमार्क
बेंचमार्कमध्ये रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट, फायनान्सियल बेंचमार्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रसिद्ध भारत सरकारच्या 3 महिन्यांच्या ट्रेझरी बिलावर दिला जाणारा रेट, एफबीआयएल कडून प्रसिद्ध भारत सरकाच्या 6 महिन्यांच्या ट्रेझरी बिलावर देण्यात येणारा रेट आणि एफबीआयएल कडून प्रसिद्ध अन्य दुसर्‍या बेंचमार्क रेटचा समावेश आहे. आरबीआयने यापैकी कोणत्याही बाजार व्याजदरापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला होता.

7.90 टक्के व्याजदराने घ्या होम लोन
SBI ने होम लोनच्या व्याज दरात कपात केली आहे. 1 जानेवारी 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावे लागणार आहे. SBI ने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मिनिटात मिळवा कर्ज मंजूरी
SBI च्या ऑफरनुसार जर तुम्ही YONOSBI द्वारे 31 डिसेंबरपूर्वी होम लोनसाठी अ‍ॅप्लाय केले तर तुमच्या कर्जाला इन्स्टंट इन-प्रिन्सिपल अ‍ॅप्रूव्हल मिळणार आहे. बँकेच्या माहितीनुसार, कर्जावर प्रोसेसिंग फी कमी असेल आणि कोणतेही हिडन चार्जेस असणार नाहीत. याबरोबरच कर्जाच्या प्री-पेमेंटवर पेनल्टी लागणार नाही.

SBI कडे 30 लाख करोड रुपये जास्त जमा
अ‍ॅसेट्स, डिपॉजिट्स, ब्रँचेज, कस्टमर्स आणि कर्मचार्‍यांचा विचार करता SBI देशातील सर्वात मोठी कर्मशियल बँक आहे. ही बँक देशातील सर्वात मोठी मोर्गेज लेंडर असल्याचा दावा करते. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत, बँकेकडे 30 लाख करोड रुपये जास्त जमा आहेत. CASA दर 45 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आणि सुमारे 22.5 लाख करोड रूपये आहे. एसबीआयनुसार, होम लोन आणि ऑटो लोन मध्ये बँकेचा बाजारातील हिस्सा 25% आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/