SBI कडून आता घरबसल्या कमाईची संधी ; जाणून घ्या काय करावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ‘एसबीआय गोल्ड डिपॉजिट स्कीम’ ही नवीन योजना आणली आहे. या योजनेमध्ये जर सोन्याची गुंतवणूक केली तर घरबसल्या उत्पन्न मिळू शकते.

सोने खरेदीला एक गुंतवणूक म्हणून पहिले जाते. देशातील बहुतेक लोक सोन्याची नाणी आणि ज्वेलरीमध्ये सर्वात सुरक्षित माध्यम म्हणून गुंतवणूक करतात.

महिलांकडून सोन्याची खरेदी केवळ आभूषणे म्हणून नाही तर ऐनवेळी मदतीला येणारा ऐवज म्हणून करण्यात येते. घरामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या किमती वाढतात मात्र त्यावर कोणतीही अतिरिक्त कमाई करता येत नाही. आता हेच सोने SBI च्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत बनणार आहे.

अशा प्रकारे करा गुंतवणूक –
सोन्याचे नाणी, गोल्ड बार अशा सोने ज्यात धातू मिक्स नसतो असे सोने बँकेत जमा करता येईल. ग्राहक अर्जाचा फॉर्म, ओळखपत्र, एड्रेस प्रूफ आणि फॉर्म भरून सोने जमा करू शकता. SBI बँकेने देशातील सात शाखांना अधिकार दिले आहेत. SBI च्या वेबसाइटवर गोल्ड डिपॉझिट योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे.

सोने जमा करण्याच्या मर्यादा –
या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांना कमीतकमी ३० ग्रॅम सोने जमा करावी लागेल. जास्तीत जास्त सोने जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही.

योजनेचा कालावधी –
१) कमी कालावधीच्या ठेवींच्या अंतर्गत १ ते ३ वर्षे सोने ठेव म्हणून जमा केले जाऊ शकते.
२) मध्यमकालीन सरकारी ठेवींमध्ये ५ ते ७ वर्षे गुंतवणूक करू शकता.
३) दीर्घकालीन सरकारी ठेवी १२ ते १५ वर्षे गुंतवू शकतात.

एवढे मिळेल व्याज / व्याजदर –
१) कमी कालावधीच्या योजनेमध्ये १ वर्षासाठी सोने जमा केल्यावर ०. ५५ % , १ ते २ वर्षांसाठी ०. ५५ % आणि २ ते ३ वर्षांसाठी ०. ६० % दराने व्याज
मिळेल.
२) मध्यमकालीन कालावधीच्या ठेवीवर २. २५ % व्याज मिळेल.
३) दीर्घकालीन कालावधीच्या ठेवीवर २. ५०% व्याज मिळेल.

गुंतवणूक कोण करू शकेल –
यामध्ये ग्राहक वयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडू शकतो. भागीदारी फर्म, प्रोप्रायटरशिप, नोंदणीकृत म्युच्युअल फंड, सेबी, एक्सचेंज ट्रेड फंड, ट्रस्ट, कंपनी यांपैकी कोणीही या योजनेमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.