SBI-IMPS Charges | SBI ग्राहकांना झटका! बँकेने 1 फेब्रुवारीपासून ‘या’ सर्व्हिससाठी वाढवला चार्ज, द्यावे लागतील 20 रुपये + GST

नवी दिल्ली – SBI-IMPS Charges | 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले (Bank Charges Inceased) आहेत. तसेच, आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 फेब्रुवारी 2022 रोजी आणखी एक शुल्क वाढवणार आहे. जर तुमचे खाते या बँकेत असेल तर तुम्हाला मोठा झटका बसणार आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून IMPS व्यवहारांसाठी नवीन स्लॅब जोडण्यात आला आहे. तो 2 लाख ते 5 लाख रुपये आहे. (SBI-IMPS Charges)

 

आता किती लागेल शुल्क?

SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे पाठवण्याचे शुल्क 20 रुपये + GST असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर 2021 मध्ये IMPS द्वारे व्यवहार करता येणार्‍या रकमेची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली होती.

 

IMPS म्हणजे काय?

आयएमपीएसला तात्काळ मोबाईल पेमेंट सेवा म्हणतात. IMPS ही बँकांद्वारे ऑफर केलेली लोकप्रिय पेमेंट सेवा आहे, जी रिअल-टाइम इंटर-बँक फंड ट्रान्सफरला परवानगी देते, जी रविवार आणि सुट्ट्यांसह 24 बाय 7 उपलब्ध आहे.

 

ATM मधून पैसे काढणे महागले

जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. एटीएममधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी (Cash transaction) ग्राहकाला जास्त शुल्क द्यावे लागेल. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अ‍ॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएमच्या मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांवर 21 रुपये अधिक जीएसटी लागू होईल. हे सुधारित दर 1 जानेवारी 2022 पासून लागू झाले आहेत.

 

 

हे आहे नवीन लिमिट

पुढील महिन्यापासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील.
आरबीआयने सांगितले होते की, जास्त इंटरचेंज चार्ज आणि सामान्य खर्चात वाढ झाल्यामुळे,
व्यवहारावरील शुल्क 21 रुपयांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. (SBI-IMPS Charges)

 

Web Title :- SBI-IMPS Charges | sbi bank increase imps charges from 1 february 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Zodiac-2022 | नववर्षात शनीदेवापासून ‘या’ राशींची सुटका होणार; जाणून घ्या

Pune Cyber Crime | पुण्यात महिला बँक कर्मचार्‍यालाच सायबर चोरट्यांनी घातला गंडा ! 4 हजारांसाठी गमावले 64 हजार

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार