मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठी असलेली बँक एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन येत असते. एसबीआयचे मल्टी सेविंग अकाउंट देखील मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD) ला लिंक आहे. ज्यामुळे या खात्यातील रक्कम एका विशिष्ट पातळीनंतर सरळ फिक्स डिपॉझिट मध्ये जाते. हे खाते कोणताही व्यक्ती खोलू शकतो. हे खाते तुम्ही सिंगल किंवा जॉईंट अकाउंट म्हणून खोलू शकता. सेविंग्स प्लस अकाउंट मध्ये २५,००० च्या वरील रक्कम सरळ फिक्स डिपॉझिट म्हणून जमा होते. जास्तीत जास्त १०,००० रुपयांपर्यंत ची रक्कम फिक्स म्हणून जमा होऊ शकते.
कमीत कमी रक्कम :
या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवणे बंधनकारक आहे . मेट्रो शहरांमध्ये ही रक्कम ३००० आहे तर शहरी भागात ३०००,अर्ध शहरी भागात २००० तर ग्रामीण भागात हीच रक्कम १००० इतकी असेल. या खात्यात देखील बाकी खात्यांप्रमाणेच व्याज मिळेल .
मिळतील हे फायदे:
इतर खात्यांप्रमाणे मिळणाऱ्या सगळ्या सुविधांचा लाभ या खात्यावर देखील मिळणार आहे. ज्यात एटीएम कार्ड, मोबाइल बैंकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एसएमएस अलर्ट यांसारख्या सुविधांचा लाभ मिळेल.