SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ

0
266
SBI Interest Rate | sbi interest rate hike 25bps from 15 december loan intrest rate increase
file photo

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – एसबीआय (SBI Interest Rate) ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. एसबीआयच्या ग्राहकांना बँकेने नवीन वर्षाआधी मोठा दणका दिला आहे. एसबीआयच्या कर्ज व्याजदरात वाढ (SBI Interest Rate) केलेली आहे. त्यामुळे कर्जदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसबीआयने आपल्या एमसीएलआरच्या दरात 25 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदरात वाढ झाली आहे. या नवीन निर्णयामुळे कोट्यवधी ग्राहकांना फटका बसला आहे. त्यामुळे बँकेतून घेतलेली सर्वच कर्जे आता महाग झाली आहेत.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने 7 डिसेंबर 2022 रोजी व्याजदरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर लगेचच सर्व बँकांनी देखील आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयने या पार्श्वभूमीवर 25 बेसिस पॉईंटने व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयचा रेपो रेट वाढून 6.25 टक्के झाला आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, एक ते तीन महिन्यांचा एमसीएलआर 7.75 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आला आहे.

एसबीआयच्या नवीन व्याजदरांनुसार सहा महिने ते एक वर्षाचा एमसीएलआर 8.05 टक्क्यांवरून 8.30 टक्के
वाढवण्यात आला. तर दोन वर्षांचा एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.50 टक्के पर्यंत गेला आहे.
सोबत तीन वर्षांचा एमसीएलआर 8.35 वरून 8.60 टक्के वाढला आहे.
त्यामुळे एसबीआयचे कर्जदार हवालदिल झाले आहेत.

Web Title :- SBI Interest Rate | sbi interest rate hike 25bps from 15 december loan intrest rate increase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

Deepika Padukone-Pathan Song | पठाण चित्रपटातील गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून नवा वाद सुरु; हिंदू महासभेने दिला इशारा