SBI कडून ग्राहकांना आणखी एक धक्का ! आता गृहकर्ज घेणार्यांना द्यावे लागणार ‘हे’ चार्जेस, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बचत आणि एफडी खात्यांवरील व्याज दर कमी केल्यानंतर आता बँकेने सांगितले की गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून प्रोसेसिंग शुल्क वसूल करण्यात येईल. यामुळे सणासुदीला ग्राहकांना कर्ज घेणे महागणार आहे, ग्राहकांना कर्ज घेताना खिसा जास्त ढिला करावा लागणार आहे.
या ग्राहकांना मिळेल दिलासा
बँकेने सूचना पत्र जारी करुन सांगितले आहे की सणासुदीच्या दिवसात प्रोसेसिंग शुल्क माफ करण्याची ऑफर 16 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत ज्या लोकांचे कर्ज प्रोसेसिंग झाले आहे त्यांच्याकडून बँक प्रोसेसिंग शुल्क वसुल करणार नाही. 16 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या दरम्यान प्रोसेस होणाऱ्या कर्जावर बँक शुल्क वसुल करेल.
या प्रकारच्या कर्जावर लागेल प्रोसेसिंग शुल्क
बँकेकडून सांगण्यात आले की गृह कर्जचे टॉप अप प्लॅन, कंपनी आणि बिल्डर्सला देण्यात येणाऱ्या कर्जावर प्रोसेसिंग शुल्क लागू आहे. बँकेने जुलै 2019 पासून कर्जाचे व्याज दर रेपो दराशी जोडले आहेत. या आधी देखील बँक सर्वात कमी व्याजाने लोकांना कर्ज देत होती, यानंतर आरबीआयने दोनदा रेपो दरात कपात केली आहे.
बँकेने रेपो दराला कर्जाचे व्याज जोडल्यानंतर एक सॉफ्टवेअर लॉन्च केले होते ज्याला 1 ऑगस्टला बंद केले, अंतर्गत बचतीनंतर बँकेने अन्य शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटला व्याज दर जोडले. बँकेने सांगितले की ग्राहकांना 0.4 टक्के प्रोसेसिंग शुल्क वसूल करण्यात येईल. हा शुल्क 1 हजार रुपयांपासून 30 हजार रुपये असेल. बिल्डरला पाच हजार रुपये फ्लॅट शुल्क द्यावे लागेल.
Visit : Policenama.com
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम