SBI देतेय स्वस्त घर खरेदी करण्याची संधी ! कमी व्याजदरासह गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असते. आत्ताही आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती असताना बँकेने आपल्या ग्राहकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत सर्व प्रकारच्या गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. त्याचबरोबर एसबीआय सध्या वार्षिक 6.28% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. एसबीआय नियामक गृहकर्ज योजना, सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसबीआय प्रिव्हिलेज होम लोन, सैन्य व संरक्षण कर्मचार्‍यांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज सुविधा देत आहे.

मिस कॉल देऊन मिळवू शकता संपूर्ण माहिती
एसबीआय मॅक्सगेन होम लोन, स्मार्ट होम्स, विद्यमान ग्राहकांसाठी टॉप-अप लोन, एनआरआय होम लोन, मोठ्या निवासी कर्जांसाठी फ्लेक्सीपे होम लोन आणि महिलांसाठी विशेष एसबीआय हरघर होम लोन योजना देखील चालवित आहे. एसबीआयने सांगितले की, नवीन ग्राहक 7208933140 वर मिस कॉल देऊन गृह कर्जाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. हाऊसिंग डॉट कॉम, मकान डॉट कॉम आणि प्रॉपटाइगर डॉट कॉमचे ग्रुप सीओओ मनी रंगराजन म्हणाले की, प्रक्रिया शुल्क भरल्यामुळे गृह कर्जे खूपच महाग पडते. एसबीआयच्या या सुविधेमुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल.

एसबीआय-शपूरजी पालनजीच्या ग्राहकांना मिळणार मोठा फायदा
एसबीआयचा ऐतिहासिकदृष्ट्या कमी व्याजदरासह गृह कर्ज बाजारातील 34 टक्के वाटा आहे. एसबीआयने म्हटले की, डिसेंबर 2020 मध्ये त्याच्या गृह कर्जाच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे. त्याच वेळी गेल्या आठवड्यात बँकेने शापूरजी पालनजी रिअल इस्टेटशी करार केला आहे. त्याअंतर्गत एसबीआय आणि शपूरजी पालनजी यांच्या ग्राहकांना गृहकर्ज अतिशय जलद उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच, त्यांना अनेक अनोख्या योजनांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, नुकताच एसबीआयने 5 लाख कोटींच्या गृह कर्जाच्या व्यवसायाचा आकडा पार केला आहे. आता बँकेने आर्थिक वर्ष 2024 पर्यंत गृहकर्ज व्यवसाय 7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.