नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामधील पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) वर सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत अधिक व्याज दिले जाते. एसबीआयच्या पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर टॅक्सवर सूटही दिली जाते. तसच गुंतवणूक केल्यानंतर त्याचा अवधी पूर्ण झाल्यावर टॅक्स फ्री रिटर्नही मिळते. तसंच एसबीआयमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर कोणताही धोका नाही. त्यामुळे एसबीआयमध्ये गुंतवणूक करणे कधीही चांगलेच आहे.
एसबीआयमध्ये पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात कमी रक्कम ५०० रुपये आहे. तर वर्षात अधिकाधिक १ लाख ५० हजार रुपये जमा करता येणार आहे. ही रक्कम तुम्ही वर्षभरात हफ्त्यानुसार भरु शकता. हे पीपीएचे अकाऊंट तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही ब्रांचमध्ये ओपन करू शकतात. त्यासाठी ग्राहकांना ऑनलाईनही अर्ज करता येते.
या अकाउंटचा अवधी १५ वर्षांचा असून पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर त्यावर टॅक्स भरावा लागणार नाहीये. तसंच या अकाउंटवर ८ टक्के व्याज देण्यात येत आहे. असे असले तरी दर तीन महिन्यांनी व्याजदर हा निर्धारित असतो. हा व्याजदर सेव्हिंग अकाउंटच्या व्याजदरापेक्षा अधिक असतो.
आपण पीपीए अकाउंट एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करु शकतो. हे सर्व करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकरली जाणार नाही.
दरम्यान, यात अवघड गोष्ट म्हणजे एकच की सामन्यतः १५ वर्षांच्या आधी हे पीपीएफ अकाउंट बंद करता येणार नाही. अधिकच गरज असेल तर ते वेळे पूर्वी बंद करता येऊ शकते. मात्र त्यातही एक अट म्हणजे अकाउंट बंद करण्यासाठी किमान ५ वर्षांचा अवधी झाला पाहिजे. तरच ते बंद करता येऊ शकते.